सर्वोच्च न्यायालयाने आयपीएलसंदर्भात दिलेल्या निर्देशाच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयपीएलव्यतिरिक्त कामकाजांकरिता बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, अशी मावळते अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. जोपर्यंत तुमच्यासह १२ अन्य व्यक्तींविरोधातील चौकशीत निर्दोष आढळल्याशिवाय बीसीसीआयची सूत्रे तुमच्या हाती देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.