विजय अमृतराज निर्मित चॅम्पियन लीग टेनिस स्पर्धेच्या तपशीलवार संघाची घोषणा करण्यात आली. प्रत्येक संघामध्ये लिजंड्स, आंतरराष्ट्रीय पुरुष व महिला खेळाडू, भारतीय खेळाडू आणि दोन कनिष्ठ भारतीय युवा खेळाडू असे एकूण सहा खेळाडू असणार आहेत. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली आणि पंजाब असे सहा संघ असून, १७ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. संघाचे दोन गट करण्यात आले असून, प्रत्येक गटात तीन संघ असणार आहेत.
 k06