हॉकवेज बे चषक हॉकी स्पध्रेत अमेरिकेने ३-० अशा फरकाने भारतीय महिला संघाचा धुव्वा उडवला. पूर्वार्धातच अमेरिकेने दोन गोल करून सामन्यावर पकड घेतली होती. या पराभवामुळे भारताला रविवारी होणाऱ्या सातव्या व आठव्या स्थानासाठीच्या लढतीत खेळावे लागणार आहे.
कॅथलीन शार्केयने १०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करून अमेरिकेचे खाते उघडले.  कॅटी ओ’डोनेलने पाठोपाठ दोन गोल करून अमेरिकेचा ३-० असा  विजय निश्चित केला.