वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ८ गडी राखत भारताने वेस्त इंडिज वर परत रसशी मिळवली आहे. या विजयासह भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली आहे.  सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर टीम इंडिया काहीशी सावरली. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर विराटने आपलं अर्धशतक झळकावलं आहे.  अजिंक्य आज पुन्हा मोठी खेळी करणा असं वाटत असतानाच देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. मात्र दुसऱ्या बाजुने शतक झळकवत कोहलीने भारताजी बाजू लावून धरली, ज्याला कार्तिकने चांगली साथ दिली. विराट कोहलीने १११ धावांची नाबाद खेळी केली, तर दिनेश कार्कितने ५० धावांची खेळी केली.

त्याआधी वेस्ट इंडिजने दिलेल्या २०६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतला आहे. अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी परतला. चॅम्पियन्स करंडकात शिखर धवन चांगल्या फॉर्मात होता. विंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्येही त्याने चांगल्या धावा केल्या. मात्र गेले ३ सामने धवनला लवकर माघारी धाडण्यात विंडिजचे गोलंदाज यशस्वी होतायत.  विंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि देवेंद्र बिशुने १-१ बळी मिळवला आहे.

त्याआधी  वेस्ट इंडिजने भारतासमोर २०६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. चांगल्या सुरुवातीनंतर नेहमीप्रमाणे विंडिजची घसरगुंडी उडाली, मात्र अखेरच्या षटकात विंडिजच्या फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीने संघाने २०० धावांचा टप्पा गाठला. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी विंडिजच्या फलंदाजीचा कणाच मोडून टाकला. चांगली सुरुवात होऊनही या सामन्यात विंडिजचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. विंडिजकडून शाई होपने ५१ तर कायले होपने ४६ धावांची खेळी केली आहे. दोन्ही सलामीवीरांनी विंडिजला सावध सुरुवात करुन दिली होती. मात्र विंडिज मोठी धावसंख्या उभारणार अस वाटत असतानाच हार्दीक पांड्याने विंडिजला पहिला धक्का दिला….आणि त्यानंतर सुरु झालेली पडझड काही केल्या थांबलीच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिली विकेट गेल्यानंतर उमेश यादवने लागोपाठ कायले होप आणि रोस्टन चेसला माघारी धाडलं. या धक्क्यातून वेस्ट इंडिज सावरते न सावरतो तोच केदार जाधवने जेसन मोहम्मदला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत विंडिजला आणखी एक धक्का दिला. पाचव्या विकेटसाठी शाई होप आणि कर्णधार जेसन होल्डर यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. शाई होपने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. होप वेस्ट इंडिजला पुन्हा सामन्यात आणेल असं वाटत असतानाच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने होपचा सुरेख झेल घेत विंडिजला आणखीनच बॅकफूटवर ढकललं. यानंतर जेसन होल्डर आणि अॅश्ले नर्सही शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. त्यामुळे विंजिडची अवस्था परत एकदा बिकट झाली. लगेचच देवेंद्र बिशुला माघारी धाडत शमीने विंडिजला आणखी एक धक्का दिला. भारताकडून गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादवने ३ तर हार्दीक पांड्या आणि केदार जाधवने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

  • भारताची वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून मात, मालिकाही ३-१ ने खिशात.
  • कर्णधार विराट कोहलीचं झुंजार शतक
  • दिनेश कार्तिकसोबत विराट कोहलीसोबत १२२ धावांची भागीदारी
  • दिनेश कार्तिकच्या सहाय्याने कोहलीचा लढा सुरुच, कोहलीचं अर्धशतक
  • भारताला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद
  • दुसऱ्या विकेटसाठी रहाणे-कोहलीत भागीदारी, भारताची सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल
  • भारताची अडखळती सुरुवात, शिखर धवन ४ धावा काढून बाद
  • ९ गडी बाद होऊन विंडिजच भारतासमोर २०६ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकांमध्ये विंडिज फलंदाजांची आक्रमक फलंदाजी, धावसंख्या २०० पार
  • देवेंद्र बिशुही शमीच्या गोलंदाजीवर माघारी, विंडिजला आठवा धक्का
  • जेसन होल्डर आणि अॅश्ले नर्सलाही शमीकडून तंबूचा रस्ता, विंडिज बिकट अवस्थेत
  • मात्र मोहम्मद शमीने विंडिजची जमलेली जोडी पुन्हा फोडली, शाई होप बाद
  • शाई होपचं संयमी शतक, त्याला जेसन होल्डरचीही सुरेख साथ
  • शाई होप आणि जेसन होल्डरकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • केदार जाधवने जेसन मोहम्मदला बाद करत विंडिजला चौथा धक्का दिला
  • जेसन मोहम्मद – शाई होपकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
  • उमेश यादवने लागोपाठ २ फलंदाजांना माघारी धाडत विंडिजला बॅकफूटवर ढकललं
  • कायले होपकडून ४६ धावांची आक्रमक खेळी
  • हार्दीक पांड्याने विंडिजची जमलेली जोडी फोडली, लेव्हिस माघारी
  • लेव्हिस आणि होप संघाचं अर्धशतक फलकावर लावण्याच्या तयारीत
  • सलामीवीरांकडून विंडिजच्या डावाची सावध सुरुवात