क्रिकेट विश्वात टी-२० सामन्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत क्रिकेट विश्वात टी-२० सामन्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. त्यात २००८ साली ‘आयपीएल’ स्पर्धेने तर टी-२० स्पर्धेचे स्वरुपच पालटून टाकले. क्रिकेट सामन्यांना मनोरंजनाचा तडका देऊन टी-२० क्रिकेटमध्ये आयपीएलने स्वत:शी अशी वेगळी ओळख निर्माण केली. आयपीएलमधील प्रत्येक संघाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या स्पर्धेचे दोन वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाने तर टी-२० विश्वात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

 

मुंबई इंडियन्सने सोमवारी १७० टी-२० सामना खेळला. जगात सर्वाधिक टी-२० सामने खेळल्याचा नवा विक्रम मुंबई इंडियन्स संघाने प्रस्थापित केला. यातील ९७ सामन्यांमध्ये मुंबईने विजय प्राप्त केला, तर ७१ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने सोमवारी रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाविरुद्ध आपला १७० ट्वेन्टी-२० सामना खेळला. यात मुंबईचा ३ धावांनी पराभव झाला.