जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचला एटीपी टेनिस मालिकेतील अंतिम स्पर्धेतील उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी रॅफेल नदालशी खेळावे लागणार आहे. रॉजर फेडरर यानेही या स्पर्धेत आगेकूच राखली. जोकोव्हिचने टॉमस बर्डीचवर ६-३, ७-५ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला. या सामन्याच्या तुलनेत फेडरर याला विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्याने जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान ७-५, ४-६, ६-४ असे संपुष्टात आणले. निशिकोरीने दुसऱ्या सेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये त्याला सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. जोकोव्हिचने यंदा तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असून, एटीपी मालिकेच्या अंतिम स्पर्धेत त्याने गेली तीन वर्षे विजेतेपद मिळविले आहे.