सलामीच्या लढतीत थरारक विजयासह सुरुवात करणारे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स रविवारी आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे किंग्ज ‘रॉयल’ ठरतात की राजस्थानच आपले विजयी राज्य अबाधित राखते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
लिलावानंतर किंग्ज इलेव्हन संघाचे रूपडे पालटले आहे. सलामीच्या लढतीत चेन्नईसारख्या मातबर संघाने दिलेले २०५ धावांचे आव्हान गाठत पंजाबने दणक्यात सुरुवात केली. ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर जोडी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कर्णधार जॉर्ज बेली, अनुभवी वीरेंद्र सेहवाग, चेतेश्वर पुजारा यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत मिचेल जॉन्सन हुकमी एक्का ठरू शकतो. लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना, रिशी धवन यांनी जॉन्सनच्या साथीने आक्रमण सांभाळण्याची आवश्यकता आहे. अक्षर पटेलच्या जागी अनुभवी मुरली कार्तिकला संधी मिळू शकते.
दुसरीकडे राजस्थानला सर्वागीण सुधारणेची आवश्यकता आहे. अजिंक्य रहाणे आणि स्टुअर्ट बिन्नीला सूर गवसला आहे. संजू सॅमसन, शेन वॉटसन, ब्रॅड हॉज यांच्याकडून जबाबदार खेळीची अपेक्षा आहे. रजत भाटियाने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. जेम्स फॉकनर किंग्स इलेव्हनसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ :
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अजिंक्य रहाणे, जेम्स फॉकनर, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, ब्रॅड हॉज, स्टीव्हन स्मिथ, अभिषेक नायर, बेन कटिंग, केन रिचर्डसन, टीम साऊदी, उन्मुक्त चंद, अंकुश बैन्स, विक्रमजीत मलिक, राहुल टेवाटिया, अंकित शर्मा, अमित मिश्रा (कनिष्ठ), दीपक हुडा, रजत भाटिया, केव्हॉन कूपर, इक्बाल अब्दुल्ला, धवल कुलकर्णी, प्रवीण तांबे, करुण नायर, दिशांत याग्निक.
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड मिलर, मनन व्होरा, वीरेंद्र सेहवाग, मिचेल जॉन्सन, चेतेश्वर पुजारा, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, थिसारा परेरा, ग्लेन मॅक्सवेल, रिशी धवन, अनुरीत सिंग, संदीप शर्मा, अक्षर पटेल, ब्युरॉन हेंड्रिक्स, कर्णवीर सिंग, मुरली कार्तिक, शिवम शर्मा, शार्दुल ठाकूर, लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना, गुरकीरत सिंग मानस मनदीप सिंग.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी मॅक्स.