राजस्थान आणि दिल्ली यांच्यात ६० व्या राष्ट्रीय शालेय सी. के. नायडू क्रिकेट चषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.  
पहिल्या उपांत्य सामन्यात राजस्थानने  चंदीगडला ३० षटकांत ११८ धावांवर रोखले आणि हे लक्ष्य ३२.१ षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. चंदीगडकडून अतिकुमारने (५९) एकाकी खिंड लढवली. राजस्थानच्या विकास दयारने ४, कमलेशसिंग नागरकोटी, अशोक कुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. राजस्थानकडून प्रत्युत्तरादाखल कमलेशसिंग नागरकोटीने ३१, अर्णव गौतम २३  धावा केल्या.  
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून निर्धारित ३५ षटकात सात विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या. दिल्लीने हे ध्येय ३५ षटकात सात विकेट्स गमावून गाठले. पंजाबकडून अक्षित छाब्राने नाबाद ६१ धावा फटकाविल्या. दिल्लीच्या मुकलित भटने ३, विष्णाव मलिकने २ तर अभिजीत शर्माने १ बळी घेतला. दिल्लीकडून सूरज रायने सहा चौकार व सहा षटकारांसह नाबाद ७६ धावा करत विजय साकारला.