ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या कामगिरीत अशाच प्रकारचे सातत्य टीकवले तर तो नक्कीच भविष्यात सचिन तेंडुलकरलाही मागे टाकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने व्यक्त केला. २७ वर्षीय स्मिथने भारतीय संघाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत आपले २० वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण केले. स्मिथ सध्या दमदार फॉर्मात आहे. हॉजने फॉक्स स्पोर्ट्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्टीव्ह स्मिथवर कौतुकाचा वर्षाव केला. स्मिथ अशाच प्रकारे खेळत राहिला तर तो नक्कीच ४० ते ५० शतकं ठोकू शकतो. स्मिथ सध्या खूप उत्तम दर्जाचा खेळाचा नजराणा पेश करत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मागे स्मिथच्या नावावर एका शतकाची नोंद आहे. याच पद्धतीने स्मिथ वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत खेळत राहिला तर तो नक्कीच नव्या विक्रमाची नोंद करू शकतो, असे हॉजने सांगितले.

कसोटी विश्वात सचिन तेंडुलकरच्या नावावर २०० कसोटी सामन्यांमध्ये ५१ कसोटी शतकांचा विक्रम जमा आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा जॅक कालिसने ४५ कसोटी शतकं ठोकली आहेत, तर रिकी पॉन्टींगच्या नावावर ४१ कसोटी शतकं जमा आहेत.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

आमच्यासारखे काही क्रिकेटपटू वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत खेळण्याची फिटनेस ठेवतात. त्यामुळे स्मिथला तसे जमले तर तो नक्कीच क्रिकेट विश्वात नवा मापदंड निर्माण करून शकतो, असेही हॉज म्हणाला. स्मिथ कर्णधारी जबाबादारी स्विकारून संघाला योग्य गतीने पुढे घेऊन जात असल्याचेही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, धरमशाला कसोटीत स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाकडून स्मिथची शतकी खेळी वगळता इतर कोणताही फलंदाज चांगील कामगिरी करू शकला नाही. स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३०० धावांचे आव्हान पार केले असून ३२ धावांची किरकोळ आघाडी घेतली आहे.