मद्यपान करून गाडी चालवण्याच्या प्रकरणात दोषी; दोन वष्रे वाहन चालवण्यास मनाई

मद्यपान करून गाडी चावलण्याच्या प्रकरणात इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार वेन रुनी दोषी आढळला असून सोमवारी रुनीला येथील न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली. त्याला दोन वष्रे वाहन चालवण्यास मनाई करण्यात आली असून शंभर तास बिनपगारी सक्त सेवा (समाजसेवा) करण्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

मँचेस्टर शहरानजीक १ सप्टेंबरला पोलिसांनी तपासणीसाठी एव्हर्टन क्लबकडून खेळणाऱ्या रुनीला गाडी चालवताना अडवले. त्या वेळी त्याने कायदेशीर मर्यादेपेक्षा तिप्पट मद्यपान केल्याचे आढळले. त्यावर सोमवारी येथील स्टोकपोर्टसोमवारी येथील स्टोकपोर्ट दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यात ३१ वर्षीय रुनी दोषी आढळला. दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यात ३१ वर्षीय रुनी दोषी आढळला. ‘‘आजच्या निर्णयानंतर मी सर्वाची जाहीर माफी मागतो. मद्यपानाची मर्यादा मला माहीत नव्हती, पण मी पूर्णत: दोषी आहे. मी याआधीच कुटुंब, व्यवस्थापक , एव्हर्टन क्लबचे अध्यक्ष आणि सहकाऱ्यांची माफी मागितली आहे. आता मला तमाम चाहत्यांची माफी मागायची आहे,’’ असे रुनी म्हणाला.

श्वासोच्छ्वास तपासणीत रुनीच्या शरीरात १०४ मायक्रोग्रॅम्स इतके मद्य आढळले, इंग्लंड आणि वेल्समधील नियमांनुसार ३५ मायक्रोग्रॅम्सपर्यंत मद्यपान करून गाडी चालवू शकतो. रुनीने त्याला समाजसेवेची शिक्षा न सुनावण्याची विनंती केली, परंतु ती न्यायालयाने अमान्य केली.