रोगा: सवैजणि मंदेऽग्नौ!’ असे शास्त्रवचन आहे. मानवाला पिडणारे अनेक प्रमुख विकार आहेत. सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा असे प्राणवह स्त्रोतातले विकार; रक्तदाब, हृद्रोग, मधुमेह, स्थौल्य असे दिवसेंदिवस वाढते विकार; त्याचबरोबर आमवात, संधिवात सायटिका, फ्रोजन शोल्डर इ. . यातील आमवातग्रस्त, संधिवाताने पिडलेले रुग्ण अधिक संख्येने आहेत. यातील रुग्णांचा गोंधळ वैद्यकीय चिकित्सकांना नेमका समजून घ्यावा लागतो. शूलवेदना, शोथसूज व सांधे जखडणे ही सर्वसामान्य लक्षणे सर्वच वातविकारांत असतात. या लक्षणांनी पीडित सर्वच रुग्ण ‘मला संधिवाताचा त्रास होतो’, असे सांगत असतात. प्रत्यक्षांत बरेचसे रुग्ण ‘आमवात’ या विकाराने ग्रस्त असतात. आमवात व संधिवात या विकारांतील मूलभूत फरक समजावून घ्यायला हवा. आमवातात वर सांगितलेली तीनही लक्षणे ‘संचारी’ म्हणजे लक्षणांची जागा व वेळ, वेळोवेळी बदलणारी असतात. संधिवात विकारांत ही लक्षणे आपली जागा सहसा बदलत नाही. आमवात विकारांत वरील लक्षणे केव्हाही, शरीराच्या कोणत्याही भागाला केव्हा जखडतील हे सांगता येत नाही. म्हणूनच या रोगाला ‘अनाकलनीय’ असे वर्णिले जाते.

या विकाराकरिता सिंहनाद, गोक्षुरादि, लाक्षादि, त्रिफळा, गुग्गुळसारखी खूप खूप औषधे तारतम्याने सुचविली जातात. आमवात विकारांत स्नेह, स्वेद व लेप या उपचारांचा तारतम्याने उपयोग केला तर नक्कीच तीव्र वेदनांपासून छुटकारा मिळतो. आपल्या घरी वापरात असणारे गोडे तेल किंचित कोमट करावे, त्यात थोडे मीठ मिसळून दुखऱ्या भागावर नेमके जिरवावे. त्यानंतर मीठ मिसळलेल्या गरम पाण्याचा शेक घ्यावा. कटाक्षाने पंखा, एसी, कोल्ड्रिंक, गार पाणी, लोणची, पापड, शिळे अन्न टाळावे. झोपताना कठीण व उबदार अंथरुण हवे. त्याकरितां चटई, ब्लँकेट, कांबळे अशी निवड करावी. जेवताना किंवा इतर वेळी सुंठ चूर्ण मिसळलेले गरम पाणी प्यावे. पोळ्यांकरिता कणीक कालविताना, एका पोळीकरिता एक चमचा एरंडेल तेल मोहन म्हणून वापरावे. शक्य असल्यास सुंठ चूर्ण एरंडेल तेलावर परतावी. सुंठ व एरंडेल तेलाचे प्रमाण ‘चारास एक’ असे असावे. खूपच दुखऱ्या भागाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे गोडेतेल व तेलाच्या चतुर्थाश गवती चहा, तेल असे मिश्रण जिरवावे. त्यानंतर गरज पडली तर मीठ पाण्याचा शेक घ्यावा. आपल्याकडे आंबेहळद, रक्तरोज, तुरटी असल्यास आमवाताने जखडलेल्या भागास वरील तीन गोष्टी सहाणेवर उगाळून लेप तयार करावा. जाड व गरम गरम लेप लावावा. शुभंभवतु!

Eating One Spoon Oil In Morning Right After Waking Up And Clean Out Your Intestine Constipation Home remedies for Bloating
आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर फेकून देतं हे तेल; सकाळी झोपून उठताच एक चमचा तेल पिण्याचे फायदे वाचा
जाणून घ्या: अ‍ॅसिडिटी कशामुळे होते?; अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी काय करता येईल?
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
gadchiroli marathi news, gadchiroli upsc marathi news
गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणाऱ्या बीडीओची ‘युपीएससीत’ही भरारी…..

आम्लपित्त उलटी

आयुर्वेदातील मूळ संहिता ग्रंथातील चरक व वाग्भट संहितात आम्लपित्त ही स्वतंत्र व्याधी सांगितलेली नाही. आम्लपित्ताची यशस्वी चिकित्सा करताना मला गणिताची मोठी मदत होत असते, यावर तुम्ही विश्वास जरूर ठेवावा. वात, पित्त व कफ यांचा ंत्रिकोणात्मक विचार केला तर नेमका उपचार करता येतो. आम्लपित्त हा पित्तप्रधान विकार असला तरी त्याला वात व कफ या दोन बाजू असतात याचे भान ठेवावे. त्याला कफाची झालर किंवा वायूची लहर असू शकते. शहरी जीवनांतील राहणीमुळे बऱ्याच लोकांना होणारा हा विकार आहे. जेव्हा भूक असेल तेव्हा जेवायचे नाही, जेव्हा भूक नसेल तेव्हा अवाजवी व पुन:पुन्हा खावयाचे; यामुळे आम्लपित्त विकार बळावेल यात नवल ते काय? पित्ताला म्हणजेच अग्नीला वेळच्या वेळी काम दिले नाही म्हणजे त्याचा उपद्रव अ‍ॅसिडिटीच्या रूपाने होतो. हा विकार बऱ्याच वेळा तीव्र पोटदुखी किंवा अल्सर विकाराची पहिली पायरी असते. मोठमोठय़ा कंपन्यांचे संयोजक, उद्योगपती, सतत कामात व्यग्र असणारे लहानसहान कर्मचारी व फार ‘बिझी’असणारे समाजसेवक यांना आपल्या आरोग्याकडे बघावयास वेळ नसतो. अशा मंडळींना हटकून होणारा हा विकार आहे.

वाचा- राष्ट्रीय आरोग्य धोरण’ रखडले!

आम्लपित्त हा विकार म्हणून आपल्या शरीरात घर करायच्या अगोदर त्याची चाहूल लागलेली असते. छातीत जळजळ, पोटांत गॅस धरणे, पोट फुगणे, तोंडाला पाणी सुटणे, क्वचित पोट दुखणे, पोट साफ नसणे, मलावरोध, डोकेदुखी, उलटीची भावना, दात आंबणे या छोटय़ा छोटय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष केले की आम्लपित्त विकाराचा शिक्का पक्का असतो.

या विकाराची सुरुवात काही वेळा डोकेदुखीने होते. काही वेळा नुसतीच उलटीची भावना होते. काही वेळेला खूप जोराची उलटी होऊन हिरवे, पिवळे पित्त पडते. कधी ओठावर सूज येते; दातांना कंगोरे पडतात; पोट साफ होत नाही. काहींना खूप थकवा येतो, कोणाला डिप्रेशन किंवा खूप घबराट होते. बहुतेक आयुर्वेदतज्ज्ञ लघु सूतशेखर, भूनिम्बादि क्वाथ, आम्लपित्त वटी, शतावरी कल्प किंवा शतावरीघृत, त्रिफळा चूर्ण यांचा वापर करतात.

ज्यांना आम्लपित्त विकारावर औषधाशिवाय ‘छुटकारा’ हवा आहे त्यांनी ‘यो लाजैर्यजति, स पशोवान भवति!’ या श्रीगणपती अथर्वशीर्षांतील फलश्रुतीतील श्लोकाची आठवण ठेवावी. आम्लपित्त विकारांत बेंबीपासचे मोठय़ा पित्ताच्या साठय़ातील पित्त उसळत असते. त्याकरिता पित्त स्थिर करण्याचे काम साळीच्या म्हणजे भाताच्या; राजगिराच्या किंवा ज्वारीच्या लाह्य म्हणजे ‘बेस्ट बेस्ट’ उपाय. मात्र या लाह्य कोरडय़ा कोरडय़ा खाव्या. आम्लपित्त विकारांत ‘अत्यम्बूपानाद मंदाग्ने:!’ हे शास्त्रवचन लक्षात ठेवावे. सुवर्ण गैरिक किंवा गुळगुळीत गेरूचा तुकडा जरी थोडा वेळ तोंडात ठेवला तरी आम्लपित्त, डचमळणाऱ्या पित्ताला लगेच आराम पडतो. चहा, आंबवलेले शिळे अन्न, मांसाहार कटाक्षाने टाळावा. चांगल्या दर्जाच्या काळ्या मनुका रोज किमान तीसचाळीस तरी खाव्या.

जेव्हा भूक असेल तेव्हा जेवायचे नाही, जेव्हा भूक नसेल तेव्हा अवाजवी व पुन:पुन्हा खावयाचे; यामुळे आम्लपित्त विकार बळावेल यात नवल ते काय?