हा वर्षाचा तो काळ आहे ज्यामध्ये तुमच्या बँक खात्यात भरगच्च दिवाळी बोनस जमा झालेला असतो. तुमच्या बँक खात्यात थोडे जास्त पैसे दिसणे ही नक्कीच सुखावह बाब असली, तरी अनेकजण त्याचा चांगला वापर कसा करावा याबाबत अनभिज्ञ असतात. तुम्हाला योग्य रीतीने धोरण आखण्यास मदत करणारी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या बोनसला नियमित उत्पन्नाचा भाग मानणे. विशेषत: त्याला अतिरिक्त धनलाभ मानू नका कारण तसे मानले की त्यासोबतच तो अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याचा मोहसुद्धा बळावू लागतो. तुमच्या बोनसमधून जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आणि कालांतराने त्यात वाढ करण्यासाठी तुम्ही पुढील पर्याय विचारात घेऊ शकता.

आणीबाणीसाठीचा निधी

जर तुमच्याकडे आधीपासूनच जास्त बचत नसेल, तर तुमच्याकडील अतिरिक्त पैशाचा वापर संभाव्य आपत्तीच्या वेळी लागू शकणारा निधी उभारण्यासाठी केला जाऊ शकतो, जो अनियोजित आर्थिक आणीबाणीच्या वेळी उपयोगी ठरू शकतो. जर तुमच्याकडे आधीपासूनच असा निधी साठवला जात असेल, तर तुम्ही तुमचा बोनस – किंवा त्याचा एक अंश तरी – महागाई आणि इतर अतिरिक्त खर्चांच्या तुलनेत सुसंगत राहण्याकरिता निधीत भर घालण्यासाठी वापरू शकता. या आणीबाणीच्या वेळचे पैसे बाळगण्यासाठी रोखता चांगल्या असणाऱ्या सोयीच्या निधींचे पर्याय निवडा. ते मोडायला सोपे असतात आणि तुलनेने त्यात कमी जोखीम असते. पारंपरिक बँक ठेवींच्या मानाने ते थोडी जास्त मिळकत देण्यासाठीही ओळखले जातात.

दीर्घकालीन गुंतवणूक

तुमचे उत्पन्न व खर्च नीट मार्गी लागलेले असतील, तर तुम्ही निश्चितच तुमचा बोनस दीर्घकालीन गुंतवणुकीकडे फिरवून त्यातून जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न करावा. दीर्घकाळात महागाईवर मात करण्यासाठी समभाग हा सर्वोत्तम पर्याय आहे, आणि समभाग म्युच्युअल फंड्स हे तुमच्या अनेक दीर्घकालीन ध्येयांची पूर्तता करण्यासाठी यथार्थ गुंतवणुकीचे पर्याय ठरु शकतात. तुमच्या मनात ३ वर्षे किंवा त्याहून कमी कालावधी असेल तर तुम्ही कमी जोखमीच्या डेट म्युच्युअल फंड्समध्ये किंवा हायब्रिड फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही या पर्यांयाचा स्वीकार केलात, तर म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा गुंतवणूक करू नका.

एसआयपीमध्ये भर घालणे

जर तुम्ही सज्ञान म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल आणि एका किंवा अधिक म्युच्युअल फंडांमध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी) राबवत असाल, तर दिवाळी बोनस ही तुमच्या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमध्ये भर घालण्याची उत्तम संधी असते. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने जसा तुम्हाला लाभ होतो, तसाच ठराविक कालांतराने तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेत वाढ केल्यानेही तुम्हाला दीर्घकाळ लाभ होत असतो. तुम्ही कोणाची थकबाकी किंवा उधार देणे नसाल, तर तुमचा दिवाळी बोनस लाभदायक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणे हा सर्वोत्तम निर्णय असतो आणि यातून सूज्ञ आर्थिक नियोजन दिसून येते.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबाझार