सध्या अगदी तिशी-पस्तीशीतच केस गळणे, कोंडा होणे आणि पांढरे होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. मग यासाठी वेगवेगळ्या उपायांचा आधार घेतला जातो. पांढरे केस लपविण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या उपायांमध्ये मेहंदी, डाय आणि इतरही अनेक उपाय असतात. अनुवंशिकता, शरीराचे योग्य ते पोषण न होणे  यांसारखी काही कारणे याला कारणीभूत असतात. मात्र केस पांढरे होण्यामागील नेमक्या कारणाचा शोध घेणे गरजेचे असते. याशिवाय बाजारातील सौंदर्य उत्पादनांमुळे काही अपाय होण्याचीही शक्यता असल्याने योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. मग काय करायचे? तर काही घरगुती उपायांनी ही समस्या आपण दूर करु शकतो. पाहूयात काय आहेत हे उपाय…

१. आवळा – आवळा हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र आकाराने अतिशय लहान असणारा हा आवळा पांढऱ्या केसांपासून सुटका करण्यासाठीही तितकाच उपयुक्त असतो. आवळ्याचे बारीक तुकडे खोबरेल तेलात टाकून हे तेल कोसांना लावल्यानेही फायदा होतो. दररोज सकाळी अर्धा आवळा खाल्ल्यास तो शरीरासाठी आणि केसांसाठीही चांगला असतो.

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

२. काळी मिरी – काळी मिरी पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे उपयुक्त असते त्याचप्रमाणे केसांच्या काळेपणासाठीही उपयुक्त असते. १० ते १२ काळी मिरीचे दाणे पाण्यात उकळून केस धुतल्यानंतर केसांवर टाकावे. दिर्घकाळ हा उपाय केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो.

३. कॉफी आणि ब्लॅक टी – तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्येने बेजार असाल तर ब्लॅक टी आणि कॉफीचा उपयोग करावा. पांढरे झालेले केस क़ॉफी आणि ब्लॅक टीच्या अर्काने धुतल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते.

४. कोरफड – केसांना कोरफडीचा गर लावल्यास केस गळणे आणि पांढरे होणे या समस्यपासून सुटका होते. कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबू पिळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. अतिशय फायदेशीर ठरते.

५. दही – पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका करायची असल्यास दह्याचा वापर करावा. यासाठी मेहंदी आणि दही समान प्रमाणात भिजवावे आणि ते केसांना लावावे. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास फायदेशीर ठरतो.

६. गायीचे दूध – दूध अनेक कारणांसाठी आरोग्यदायी असते. पांढरे केस काळे करण्यासाठीही गायीच्या दुधाचा उपयोग होतो. त्यामुळे आहारात गायीच्या दुधाचा समावेश करावा.

७. भृंगराज आणि अश्वगंधा – केसांच्या आरोग्यासाठी अश्वगंधा आणि भृंगराज या वनस्पती अतिशय उपयोगी असतात. या दोन्हीची पेस्ट बनवून ती खोबरेल तेलात मिसळावी. एक तास हे तेल लावून ठेवावे आणि मग धुवावे. त्यानंतर कोमट पाण्याने केस व्यवस्थित धुवावेत. यामुळे केसांचे कंडिशनिंग होऊन ते काळे होण्यासही मदत होते.