मानव हा सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणत खुद्द मानवानेच अनेक वर्षे स्वत:ची फसवणूक सुरू ठेवली आहे.
“अनेक वर्षांपासून धर्म विश्लेषक ते तत्वज्ञ हे सर्वच जण मानव हा प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत आले आहेत. मात्र, प्राण्यांकडे असणाऱ्या कॉगनेटीव्ह फॅकल्टीज मानवापेक्षा चांगल्या असल्याचे विज्ञान सांगते ” असे अडलॅडस विद्यापीठाचे वैद्यक विज्ञान विभागाचे डॉ. ऑर्थर सॅनोटीस म्हणाले.
मानवाने १०,००० वर्षांपूर्वी शेतीचा शोध लावून अन्न धान्य उत्पादनास सुरूवात केली. शेती वरोबरच त्याने प्राणी पाळण्यास देखील सुरूवात केली.   
“संघटीत धर्मांनी देखील मानवच श्रेष्ठ असल्याचे नेहमी सांगितले. तत्वज्ञ व विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल याने देखील तार्कीकदृष्टीकोण केवळ मानवाकडेच असल्याने मानव हाच सर्वश्रेष्ठ प्राणी असल्याचे म्हटले आहे.” असे सॅनोटीस म्हणाले.          
औद्योगिक क्रांती झाल्यावर प्राण्यांच्या हक्कांबद्दल १९व्या शतकामध्ये चर्चा सुरू झाली. प्राण्यांकडे मानसाला अवगत नसलेले अनेक गुण असल्याचे प्राध्यापक मॅसिज हॅम्बर्ग यांनी म्हटले आहे. “खरे म्हणजे आपण त्यांना व त्यांनी आपल्याला ओळखलेलेच नाही. त्यामुळे आपल्याकडेच काहीतरी वेगळे ज्ञान आहे असे समजण्याचे कारण नाही. प्राण्यांचे ज्ञान देखील आपल्यापर्यंत पोहचलेच आहे असे देखील नाही,” असे हम्बर्ग म्हणाले. तंत्रज्ञान व भाषेच्या जोरावर आपण आपल्याला श्रेष्ठ मानत आहोत. त्यामुळे इतर प्राण्यांच्या क्षमतांचा आपम विचारच करत नसल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.