साहित्य –

रवा – एक वाटी, मैदा – एक वाटी, दूध – दोन लिटर, साखर – दोन वाटय़ा, चारोळे, बदामाचे काप, काजू – आवडीनुसार, पिस्त्याचे काप – दोन चमचे, दूधात भिजवलेले केशर – दहा ते बारा काडय़ा, साजूक तूप – तळण्यासाठी, जायफळ – अर्धा चमचा वेलची पावडर – एक चमचा.

कृती –

रवा, मैदा एकत्र करा. त्यात चिमूटभर मीठ घाला. गरम केलेले तूप दोन चमचे घाला. पीठ मळून घ्या. या पिठाच्या पुऱ्या करून तुपात तळून घ्या. दूध आटवायला ठेवा. निम्मे करा.तुपात काजू, बदामाचे काप तळून घ्या.दुधात साखर घाला. पुऱ्या कुस्करून घाला, बदामाचे काप, काजू, चारोळे, पिस्त्याचे काप, केशर, जायफळ, वेलदोडे पावडर घाला. थोडं उखळून घ्या. नंतर गरम किंवा गार कसेही सव्‍‌र्ह करा. चविष्ट लागते.

मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा