रिलायन्स कंपनी सातत्याने नवनवीन योजना आणत आपल्या ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असते. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात सध्या कंपनीने जिओचे कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट अशा सुविधा देत आपल्या ग्राहकांवर छाप पाडली आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता आहे. याशिवाय रिलायन्सच्या या नव्या प्रयोगांमुळे बाजारातील इतर टेलिकॉम कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशननेही उडी घेतली असून त्यांनी नुकताच आपला एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि व्हॉईस कॉलिंग दोन्हीही मिळणार आहे.

आता डेटा आणि व्हॉईस कॉलिंगचे इतरही अनेक प्लॅन असताना या प्लॅनमध्ये इतके काय विशेष आहे. तर ग्राहकांना अवघ्या ३३ रुपयांचा हा प्लॅन मिळणार असून वेगवेगळ्या सर्कलमध्ये या प्लॅनची किंमत काही प्रमाणात वेगळी असू शकते असेही कंपनीने सांगितले आहे. नुकतेच कंपनीने आपल्या ग्राहकांना २ जी मधून ४ जी मध्ये अपग्रेड करण्यास सांगितले होते. नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर एका तासासाठी व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे. मात्र यासाठी दोन दिवसांचीच मुदत असणार आहे.

नवरात्रीनिमित्त ‘या’ मोबाईल्सवर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनकडून बंपर सूट

याआधीही कंपनीने आपला १४७ आणि १९३ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. यामध्ये १४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळतो. हा प्लॅन आरकॉमच्या सर्व सर्कलसाठी उपलब्ध आहे. मात्र यासाठी तुमच्याकडे रिलायन्सचा ३ जी फोन असण्याची आवश्यकता आहे. या ग्राहकांनाच केवळ या १४७ रुपयांच्या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांसाठीच हा प्लॅन उपलब्ध असेल. १९३ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच हा प्लॅन आहे. मात्र यामध्ये दररोज १ जीबी डेटासोबत व्हॉईस कॉलिंगसाठी ३० मिनिटंही मिळणार आहेत.

टीप – ग्राहकांनी कंपनीच्या संबंधित वेबसाईटवरुन खात्री करुन मगच रिचार्ज करावे.