मोठमोठे मॉल, दुकाने आणि ऑनलाईन शॉपिंग साईटसवरही सेलचे बिगुल वाजत आहे. सेल हा शब्द नुसता कानावर पडताच लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वचजण त्याकडे चुंबकासारखे आकर्षित होतात. अमुक-अमुक गोष्टीवर ५० टक्के किंवा अगदी ७० ते ८० टक्के सूट हा शब्द ऐकताच प्रत्येकजण आपल्याला काय काय खरेदी करायचे आहे हे नकळत आठवायला लागतो. मात्र खरेदी करताना आपले जास्तीचे पैसे जाऊ नयेत आणि खरेदी नेमकी व्हावी यासाठी काही गोष्टींची आवर्जून काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपली खरेदी जास्त चांगली होऊ शकेल? पाहूया…

मुलं भाज्या खात नाहीत ? हे उपाय करुन पाहा

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

१. कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी ती गोष्ट ऑनलाईन वेबसाइटवर नक्की बघा. कारण एखाद्या वेबसाइटवर घसघशीत डिस्काऊंटसह ती वस्तू तुम्हाला कमी किंमतीत मिळू शकते. विशेषतः कपडे, बुट यांसारख्या वस्तूंची खरेदी करतेवेळी तुम्ही थोडी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

२. उपयोग नसताना एखादी गोष्ट आवडली म्हणून ती खरेदी करुन वायफळ खर्च करु नका. घरातून निघताना तुमचे बजेट ठरवा आणि त्यानुसारच खरेदी करा. नाहीतर विनाकारण जास्तीचा खर्च होऊन तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.

३. ‘मॅडम ही वस्तू इतक्या कमी किंमतीत तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही.’ ‘सर तुम्ही आमचे नेहमीचे ग्राहक आहात’, अशी हजारो फसवी आश्वासने देऊन दुकानदार आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करण्यास भाग पाडतात. दुकानदार प्रत्येक ग्राहकाला हेच आश्वासन देत असतात कारण आपले उत्पादन ग्राहकांना खरेदी करायला लावणे हे त्यांचे कामच असते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका.

जिओचा ४जी फोन खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

४. सेलच्या सीझनमध्ये जर तुम्ही खरेदी करायला जात असाल तर पहिले दोन दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत, कारण पहिल्या दोन दिवसात तुम्हाला नवनवीन, वेगवेगळ्या रंगाचे व साइजचे कपडे किंवा इतर वस्तूही सहज उपलब्ध असतात. मात्र तुमचे बजेट जर कमी असेल तर मात्र शेवटचे दोन दिवस तुमच्यासाठी चांगले ठरु शकतात, कारण या दिवसात तुम्हाला ७० टक्क्यांहून अधिक डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो.

५. सेलमध्ये तुम्हाला कपडे घ्यायचे असल्यास त्याचा तपशील म्हणजेच रंग, साईज यांची माहिती असणे गरजेचे असते. सेलमध्ये स्टँडर्ड साइजचे कपडे लवकर मिळत नाहीत तर मोठ्या साइजचे कपडे मात्र पटकन मिळतात. त्यामुळे एखादा कुर्ता किंवा टॉप तुम्हाला आवडला असेल पण तो तुमच्या मापाचा नसेल तर मोठ्या साइजचे विकत घ्या. नंतर तुमच्या मापानुसार तो अल्टर करुन घेऊ शकता.