पावसाळ्यात सगळीकडे ओलावा असताना फॅशन करणे तसे अवघडच; पण तरीही बारा महिने स्टाइलिश राहणारे त्यातही कल्पकता दाखवितात. ते नवनवीन काही तरी शोधत राहतातच. त्यातूनच रेनी सीझन फॅशन बाजारात अवतरते. पूर्वीच्या काळी खास पावसाळ्यासाठी जुने कपडे राखून ठेवले जात असत. त्यामुळे बाजारही काहीसा थंडच असायचा. मात्र आता तो जमाना कालबाह्य़ झालाय. कारण आता खास रेनी सीझनसाठी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. खास पावसाळ्यासाठी म्हणूनही शॉपिंग होऊ लागली आहे..

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
dhule rain, rain in dhule, dhule rain marathi news
धुळे शहरात हलका पाऊस

पावसाळा म्हणजे सर्वत्र ओलसरपणा, दमटपणा. कुंद आणि धुंद वातावरण. अनेक प्रतिभावंतांच्या काव्यप्रतिभेला स्फूर्ती देणारी हवा. मनातील भावनांना साद घालणाऱ्या या ऋतूत जसे निसर्गाचे रंग बदलतात, तशी जीवनशैलीही बदलते. बाहेर पडताना सोबत छत्री घ्यावी लागते. सारे शरीर झाकणारे रेनकोट आता मुलांपुरते मर्यादित असले तरी  विनसिटर,  टोप्या वापरल्या जातात. वस्तू तीच मात्र दर वर्षी त्यात नावीन्य शोधण्याकडे तरुणाईचा कल असतो. पूर्वी छत्री म्हटली की पुरुषांसाठी काळ्या रंगाची आणि महिलांसाठी विविध रंगी असे समीकरण होते. आता ते संकेत पाळले जात नाहीत. निरनिराळे आकार आणि रंगसंगतींमुळे छत्र्या अधिक आकर्षक झाल्या आहेत. काही कल्पक कलावंतांनी छत्र्यांच्या कॅनव्हासवर छान चित्रे काढण्यास सुरुवात केली आहे.

केवळ छत्र्याच नव्हे तर रेनकोटस्, बॅग्स, जॅकेट, आणि फुटवेअरच्या दुनियेतील नावीन्यपूर्ण वस्तूंनाही पावसाळी शॉपिंगमध्ये मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जाते. त्या वस्तूंचा वापर करून पावसाळ्यातही डिसेंट दिसावे, असा तरुणाईचा प्रयत्न असतो.

पावसाळ्यात पार्टीवेअर बाजूला सारून बिनधास्त कॅरी करता येतील, अशा वस्तू वापरण्याकडे तरुणांचा कल आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, लाँग ड्राईव्हला जाताना किंवा भटकंती करताना पावसाळ्यात अगदी सहज परिधान करता येतील, अशा कपडय़ांचीच सध्या चलती आहे. पावसाळ्यात काय घालायचं, हा प्रश्न नेहमीच तरुणींसमोर असतो. पावसाची रिपरिप आणि त्यात चिखल त्यामुळे कपडय़ांची काळजी घ्यावीच लागते.

यंदाच्या पावसाळ्यात बाजारामध्ये नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातील वॉटरप्रूफ असलेल्या गोष्टींकडे तरुणाईचा भर आहे. रेनकोटपेक्षा सध्या विनसिटरला  मागणी वाढली आहे. त्याबरोबर छत्र्यांमध्ये तीन घडय़ा असलेल्या छत्र्यांना पसंती मिळत आहे. सध्या रंगीबेरंगी वस्तूंकडे कल वाढल्याने लहानथोर साऱ्यांनाच काही ना काही नावीन्यपूर्ण रंगांच्या वस्तू उपलब्ध आहेत. सहज (कॅरी) सांभाळता येतील अशा वस्तू व कपडे खरेदी केले जात आहेत.

पावासाळा हा तरुणाईचा आवडता ऋतू; पण तसे असले तरी दक्षता आणि काळजी घेणे भागच पडते. नोकरदार तरुणाईने या मोसमात फॅशन करावी; पण काळजीपूर्वक. तरुणींसाठी हा मोसम फर्स्ट क्लास असून, त्यामुळे वॉटरप्रूफ मेकपकडे त्यांचा भर आहे. पावसाळा म्हटले, की चिंब भिजण्याचा आनंद लुटणे, गरमागरम भजी खाण्यासाठी निमित्त शोधणे. मनसोक्त हिंडणे आणि निळ्या-नभातून बरसणाऱ्या शुभ्र पाऊसधारा झेलत बागडणे. पावसाळ्यात पार्टीवेअर वापरण्यापेक्षा सोबर ड्रेसिंग करण्यास हरकत नाही. कॉटनचे सहज वाळतील असे कपडे वापरल्यास अतिशय उत्तम. ट्रेंड बदलत असला तरी फॅशनचा फंडा तोच आहे. बदलत्या प्रवाहानुसार स्टाइलही बदलत जाते; पण ज्यांना जे आवडेल व भावेल तसाच लुक ट्राय करावा. पावसाळ्याचे निमित्त साधून वेगळा लुक करायला हरकत नाही.

 छत्री

कलरफुल आणि नावीन्यपूर्ण छत्र्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत. तीन व दोन घडीच्या छत्र्या आल्या आहेत. त्याबरोबरच तरुणींसाठी झालरच्या छत्र्यांचा ट्रेंड आलाय. पर्समध्ये सहज बसणारी, दोन-तीन घडय़ा होणारी छत्रीही सध्या भाव खात आहे. विविध रंगांच्या व आकाराच्या या छत्र्या सध्या मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. जुन्या काळातील लांब, आजोबांच्या काठीसारख्या छत्र्यांना नाक मुरडणारी मंडळी आता त्याच छत्र्या मोठय़ा आवडीने वापरताना दिसते. पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रंगीबेरंगी, लांब आणि घडीच्या अशा विविध छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान छत्र्या आल्या असल्या तरी मोठय़ा छत्र्यांचा ट्रेंडही कालबाह्य़ झालेला नाही. १५० ते १००० रुपयांपर्यंत सर्व प्रकारच्या छत्र्या बाजारात सहज उपलब्ध आहेत.

जीन्स

पावसाळ्यात सोईस्कर वाटावा असा पेहराव करावा. त्यासाठी बाजारपेठांमध्ये तरुणींसाठी टू-पीस जीन्स, थ्री-फोर्थ जीन्स आणि डार्क कलरचे पिंट्रेड टी-शर्ट बाजारपेठेत आले आहेत. त्यातील ग्रीन, ऑरेंज, ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू अशा रंगांचे समीकरण तर त्यांच्या अधिक पंसतीस पडत आहे. तरुणांसाठी बम्र्युडा, शॉर्ट जीन्स आणि थ्री-फोर्थ असे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तरुणींसाठीही बरेच प्रकार उपलब्ध आहेत. पिंट्रेड टी शर्ट्समध्ये गुलाबी, हिरवा, लाल, पिवळा, काळ्या या भन्नाट रंगांची जोड आहे. या ऋतूत हलके, पटकन वाळतील आणि सुटसुटीत असे कपडे प्राधान्याने वापरले जातात. लाइटवेट डेनिम्स, नॉन क्रशेबल कॉटन्स आणि केप्रीजही आहेत. भटकंती करणाऱ्या आणि फिरायला जाणाऱ्यांसाठी थ्री-फोर्थ आणि पिंट्रेड टी-शर्टचा पर्याय चांगला ठरू शकतो.

रेनकोट

छत्र्यांबरोबरच पावसाळ्यात महत्त्वाचा भाग बनलेल्या रेनकाटचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतील. तरुणाईसाठी वॉटर प्रिंट, ट्रान्स्परंट, चेन, मिड टॉप, लाँग टॉप, रेनकोटमधील रंगसंगती तर सर्वाना पसंत पडेल अशी आहे. तरुणांसाठी पँट-शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्स्परंट आदी प्रकार दाखल झाले आहेत. तरुणींसाठी अम्ब्रेला, लाँग कोट, टॉप विथ स्कर्ट असे रेनकोटचे प्रकार पाहता येतील; पण यंदा रेनकोटबरोबरच विनसिटरचीही  मागणी वाढली आहे.

पावसाळी पादत्राणे

पादत्राणांमध्येही तरुणांसाठी वेगळा ट्रेंड आलाय. मनमुराद भिजण्याचा आनंद घेताना शॉर्टच्या सोबतीला वॉटरप्रूफ व प्लॅस्टिकच्या स्लिपर्स आणि शूज आहेत. फ्लिप-फ्लॉप स्लिपर्स आणि वॉटरप्रूफ शूज हे लुक स्टायलिश रूप देतात. त्यामुळे यातील रंगांमध्ये तशीच विविधता आढळेल.  पावसाळी चप्पल आणि शूजमध्ये सध्या एवढी मोठी रेंज आली आहे, की घेणारा गोंधळून ‘हे घेऊ  की ते घेऊ ’ या विचारात पडतो. एवढे छान-छान रंग आणि डिझाईन त्यात आहेत. या सीझनमध्ये कॉलेजियन्सकडून ‘बेली वेज हिल’ या वॉटरप्रूफ आणि ईझिली वॉशेबल बेलीला पसंती मिळत आहे. त्याची किंमत १५० ते ३५०च्या दरम्यान असून, त्यात भरपूर प्रकार उपलब्ध आहेत. क्रॉक्स स्टाइल शूज, फ्लिप-फ्लॉप चप्पल, सँडल आदी विविध प्रकार चप्पलमध्ये आहेत.

कुठे मिळणार?

या सर्व वस्तूंची खरेदी तुम्ही ब्रांद्रा लिंकिंग रोड, अंधेरी मार्केट, मालाड, फॅशन स्ट्रीट येथे करू शकता. इतर अनेक सण, उत्सव आणि ऋतूंप्रमाणे ‘मान्सून’ही आता तरुणवर्गासाठी एक इव्हेंटच झाला आहे.

किंमत – २०० रुपयांपासून पुढे या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.