अनेकदा गाडी चालवताना चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या असतील. रात्रीच्यावेळी गाडी चालवताना अनेकदा थकलेल्या चालकाला झोप अनावर होते. पण गाडी रस्त्यात थांबवून झोप घेणं काही शक्य नसतं. अशा वेळी झोप अनावर झाल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि अपघात होतात किंवा अपघात होण्याच्या शक्यता तरी असते. पण आता लवकरच या समस्येवर तोडगा निघणार आहे. हाँग काँग बॅपटिस्ट विद्यालयाच्या संशोधकांनी असं अॅप शोधून काढलं आहे ज्या अपॅमुळे गाडी चालवताना चालकाला जागं राहण्यासाठी मदत होणार आहे. स्मार्टफोन युजर्सना या अॅपचा मोठा फायदा होणार आहे.

Mobile Review : जाणून घ्या कसा आहे सॅमसंग एस एट

हे अॅप सुरू करून चालकाला फक्त आपला मोबाईल समोर ठेवायचा आहे. हे अॅप चालकाचे फेशिअल एक्सप्रेशन म्हणजेच चेहऱ्याच्या हावभावावर लक्ष ठेवणार आहे. जर का गाडी चालवताना चालकाच्या चेहऱ्याच्या हावभावात बदल दिसले तर हे अॅप लगेच अलर्ट होईल. थोडक्यात चालकाच्या मानेची रचना बदलली किंवा त्याचे डोळे मिटू लागले की हे बदल अॅपमुळे लगेच डिटेक्ट होणार आहे. जेणेकरून चालकाला झोप लागलीच तर मोठ्याने अलार्म वाजायला सुरूवात होईल आणि चालक अधिक सतर्क होईल. स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या कॅमेराच्या माध्यमातून हे अॅप काम करणार आहे.

वाचा : बुमराहसारखी ‘लक्ष्मणरेखा’ ओलांडू नका; वाहतूक पोलिसांची ‘आयडियाची कल्पना’!