‘मनुष्यप्राणी हा जर उत्क्रांतीतून तयार झाला असे मानायचे तर उत्क्रांती मनुष्यापाशीच थांबली असे का मानावे? त्यानंतरही उत्क्रांतीची प्रक्रिया सुरूच आहे’, असे उद्गार विसाव्या शतकाच्या प्रारंभी महर्षी योगी अरविंद यांनी काढले होते. त्याचीच आठवण व्हावी, असे संशोधन नुकतेच पुढे आले आहे.
आधुनिकीकरण, वैद्यक विज्ञान व पौष्टिक जेवण यामुळे डार्विनने सांगितलेल्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतापासून व ‘बलशाली तोच टिकेल’ या तत्त्वापासून आपण दूर आहोत असे समजण्याचे कारण नाही. उत्क्रांतीची प्रक्रिया चालू आहे. जीवन व मरण यांच्यातून नैसर्गिक निवड होत आहे, असा दावा एका अभ्यासाअंती करण्यात आला आहे.
पाश्चिमात्य जगतात कुटुंबाचा आकार कमी होत आहे व मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. साधारण २५० वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती सुरू झाली तेव्हापासून डार्विनची उत्क्रांती कुठेही थांबलेली नाही. जनुकांवर परिणाम होत आहेत. आणि हे जनुकीय परिणामच उत्क्रांतीचे प्रणेते ठरले आहेत, असे नव्या संशोधनात पुढे आले आहे. ‘शेफिल्ड विद्यापीठात’ डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या कालसुसंगततेविषयी संशोधन करण्यात आले.
‘इव्होल्यूशन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून जनुकीय बदल हे एखाद्याने कुटुंब केव्हा सुरू करावे, त्याचा आकार किती असावा यावर परिणाम करते. उलट अठराव्या व एकोणिसाव्या शतकात हे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ आधुनिक मानव उत्क्रांत होतो आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाला प्रतिसाद देतो आहे. लोकसंख्येमध्ये आपल्याला जनुकीय फरक दिसतात त्यामुळे हे घडून येते असा वैज्ञानिकांचा दावा आहे.

संशोधनातील निरीक्षणे

संशोधकांनी चर्चमधील जन्म, विवाह व मृत्यू यांबाबत १० हजार जणांच्या नोंदी तपासल्या. अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून फिनलंडमध्ये घेतलेल्या या नोंदी होत्या व त्यानुसार उत्क्रांती अजूनही चालू आहे. स्वीडनमधील उपासला विद्यापीठाच्या एलिझाबेथ बोलंड यांनी असे म्हटले आहे की, आपण उत्क्रांत होत आहोत. जोडप्यांचा अभ्यास केला असता काहींना जास्त मुले होताना दिसतात तर काहींना कमी मुले होतात. पुनरुत्पादनाच्या यशातील फरक, पुनरुत्पादनाच्या अटींमधील तफावत यातून नैसर्गिक निवड दिसून येते, असे बोलंड यांचे म्हणणे आहे.

सांस्कृतिक प्रभाव हा सर्व काही नाही, कारण इतर अनेक छोटे परिणाम उदा. जनुकीय वारसा हे बदल घडवून आणत असतात. अभ्यासाअंती १८ टक्के लोकांच्या आयुर्मानात, कुटुंबाच्या आकारात व पहिल्या व शेवटच्या मुलाच्या जन्मातील अंतरात बदल झालेला दिसला. हे परिणाम जनुकांमुळे झालेले होते. जर जनुके असा परिणाम करीत असतील तर बदल चालू आहे, नैसर्गिक निवड चालू आहे, हे पुरेसे स्पष्ट होते.
फिनलंडमधील टुरकू व शेफिल्ड विद्यापीठातील प्रा. बोलंड आणि त्यांचे सहकारी

आधुनिक उत्क्रांतीची उदाहरणे

आपण आधुनिक काळात जगत असलो, आयुर्मान वाढले असले तरी नैसर्गिक निवडीचे तत्त्व काम करीत आहे. डार्विनने सांगितलेली उत्क्रांती थांबलेली नाही, ती उलट वेगाने सुरू आहे.
जनुकीय बदल उत्क्रांतीस कारणीभूत छोटी कुटुंबे, उशिरा कुटुंब सुरू करणे, पहिल्या व शेवटच्या मुलातील अंतर ही त्याची उदाहरणे आहेत.