‘वन लाइफ इज नॉट इनफ’ हे के. नटवरसिंग यांचे आत्मचरित्र अलीकडेच इंग्रजीत प्रसिद्ध झाले आणि त्यापाठोपाठ ‘एकच आयुष्य पुरेसे नाही..’ हा त्याचा मराठी अवतार बाजारात आला आहे. द. मा. मिरासदार lok20यांनी ‘एका नावेतील तीन प्रवासी’ या पुस्तकात असे म्हटले आहे की, ‘उत्तम भाषांतर किंवा अनुवाद हे येरागबाळ्याचे काम नव्हे..’ हे पुस्तक वाचल्यावर त्याची प्रचीतीच येते.
भारतीय राजकारण, भारताचे परराष्ट्र संबंध, गांधी कुटुंबीयांच्या आयुष्यातील छोटय़ा- मोठय़ा घडामोडी अशा विविध अंगोपांगांनी बहरलेले हे आत्मचरित्र आपल्याला त्याच्या विशिष्ट शैलीची प्रचीती आणून देते. भारतीय राजकारणाशी, विशेषत: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संबंधित असताना नटवरसिंग यांना आलेले अविस्मरणीय अनुभव, विविध व्यक्तिमत्त्वांचा झालेला साक्षात्कार तसेच त्यापलीकडे आयुष्य जगताना त्यांना कळून चुकलेल्या अनेक गोष्टींचीही त्यांनी या आत्मचरित्रात सविस्तर चर्चा केली आहे. राजकारणातील डावपेच, कुटनीती व वादविवाद यांवर प्रकाश टाकणारे हे आत्मचरित्र. आणखी एक जमेची बाजू म्हणजे भारतीय राजकारणाच्या प्रारंभिक इतिहासाला गवसणी घालणारे हे पुस्तक आहे.
तीन दशके नोकरशाहीत उच्च पदावर आणि नंतर २५ वष्रे भारतीय राजकारणात राहिलेल्या के. नटवरसिंग यांनी आपल्या मनातील शब्दचित्रे हळुवारपणे व मोकळ्या ढंगात रेखाटली आहेत. या सगळ्या बाबी म्हणजे पुस्तकाची सकारात्मक बाजू. पण याची दुसरी बाजू बघायला लागलो तर पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या मागच्या पानापासूनच यातील चुकांची रांग सुरू होते. एक वाक्य पाहा – ‘के. नटवरसिंग त्या काही मोजक्या लोकांपकी एक आहेत, ज्यांना हे माहीत आहे, की सोनिया गांधींनी २००४ मध्ये मनमोहन सिंगांना का पंतप्रधान केले. वादांशी त्यांचे नाते नवीन नाही.’
प्रास्ताविकात ‘श्रीमंत लोकच पुढे येणार असतील, तर गरिबांना ते वारसा म्हणून मातीही देणार नाहीत..’ असे एक वाक्य आहे. मूळ इंग्रजी वाक्य आहे – ‘The rich will prosper and the poor will not inherit the earth.’ बायबलमधील Meek shall inherit the earth या वाक्याचा इथे संदर्भ आहे. ज्याचा अर्थ ढोबळमानाने शांत आणि नम्र माणसे या पृथ्वीवर तग धरून राहतील असा आहे. हा संदर्भ लक्षात घेतला तर हे भाषांतर कशा प्रकारचे आहे हे जाणवते.
१९ व्या प्रकरणाचे मूळ नाव The Demise of the USSR असे आहे. ज्याचा मराठी अनुवाद ‘यूएसएसआरचे निघन’ असा करण्यात आला आहे. युएसएसआर (द युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स) चे निघन झाल्याचे वाचून काहींना मेल्याहून मेल्यासारखे होऊ शकते. २१ व्या प्रकरणाचे मूळ नाव The Millennium years असे आहे. त्याचे भाषांतर ‘शतकातील वष्रे’ असे केले आहे. ‘सोनिया गांधी’ या विसाव्या प्रकरणात पान क्रमांक २५१ वर तर डॉक्टरांचे नावच चुकीचे टाकले आहे. मूळ पुस्तकात याच प्रकरणात पान क्रमांक ३१३ वर Dr. Trehan असा उल्लेख आहे. हे नाव मराठी पुस्तकात ‘डॉ. चौहन’ असे छापले आहे.
बाराव्या प्रकरणात ‘..एकही कॅमेऱ्याचा फ्लॅश उडाला नाही.’ हे वाक्य वाचून तर आपण उडायचेच बाकी राहतो.
पान ११५ वर पुढील परिच्छेद आहे – नासीर १९७० मध्ये ‘हृदयविकाराचा झटका’ आल्यामुळे निधन पावले. त्यावेळी ते ५२ वर्षांचे होते. सहा दिवसांच्या युद्धात इस्राईलकडून झालेल्या पराभवाने ते त्याच प्रकारे प्रभावित झाले होते, ज्या प्रकारे १९६२ मध्ये चीनकडून पराभूत झाल्यावर नेहरू प्रभावित झाले होते.’ इथे अफेक्टेडचा शब्दश: अर्थ घेतल्याने गोंधळ झाला आहे. तो इथे धक्का, झालेले नुकसान असा घ्यायला हवा होता.
छपाईच्या, नावांच्या, प्रूफ रीिडगच्या चुकांना तर काही सुमारच नाही. ‘सविस्तार’, ‘आथा’, ‘हिमंत’, ‘मोरराजी’, ‘गुढगे’, ‘एकॉनॉमी’, ‘आफले’, ‘जरोदार’, ‘क्रातीच्या’, ‘दिवशीय’, ‘गॅवरीन गार्सयिा मारक्वेक’, ‘साउत’, ‘बफोर्स’ असे अनेक शब्द या पुस्तकात आढळतात. अनेक शब्दांना मराठीत प्रतिशब्द असतानाही ते इंग्रजीत तसेच ठेवले आहेत. उदाहरणार्थ- ‘अपेंडीस’ हे शीर्षक तसेच ठेवले आहे. त्यासाठी मराठीत ‘परिशिष्ट’ असा शब्द वापरता आला असता. अनेक ठिकाणी िहदी लेखनाच्या शैलीप्रमाणे क, ख, ग, घ, ड , ज या अक्षरांच्या खाली नुख्खा दिला आहे. थोडक्यात, या पुस्तकातील सगळ्या चुका सांगायला एकच लेख पुरेसा नाही.
‘एकच आयुष्य पुरेसे नाही’ – के. नटवरसिंग, अनुवादक – रवींद्र नागनाथ कोल्हे, डायमंड पॉकेट बुक्स, नवी दिल्ली, पृष्ठे – २८०, मूल्य – २९५ रुपये.    

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार