‘नाही ‘भारतरत्न’ तरी..’ हा गिरीश कुबेर यांचा भारतीय ऊर्जा क्षेत्राचे पितामह केशवदेव मालवीय यांच्यावरील lok03लेख वाचून माहीत नसलेला इतिहास कळला.  मालवीय यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नाहीतर आजकालचे मंत्री स्वत:चा उदोउदो करण्यातच धन्यता मानतात. इतिहासातील अडगळीत पडलेल्या मालवीय यांना प्रकाशात आणल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

मोलाचा विषय
‘नाही ‘भारतरत्न’ तरी..’ लेखाचा विषय खूप मोलाचा वाटला. वृत्तपत्रांचे मोल यासारख्या लिखाणामुळेच काही अंशी टिकून आहे.
– विवेक लागू

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

विचारप्रवृत्त करणारा लेख
या लेखामुळे विस्मृतीत गेलेल्या व्यक्तींबद्दल मुद्दामहून आठवणी जागवून नवीन पिढीला त्यांच्या कार्याची माहिती दिल्याबद्दल आभार. गिरीश कुबेर यांचे लेख नेहमी वेगळ्या विषयांची माहिती देतात आणि वाचकाला विचार करायला भाग पाडतात.
– पंकज पाटणकर

गतस्मृतींना उजाळा
के. डी. मालवीय यांचे ओएनजीसीसाठीचे योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या नावाची एक संस्थाही अस्तित्वात आहे. तेलउत्खननात त्याचे काम मोलाचे आहे. लेखातील अंकलेश्वर आणि बॉम्बे हाय यांच्या उल्लेखाने गतस्मृती जाग्या झाल्या. १९७३ साली ‘सागरसम्राट’ जेव्हा समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाली होती तो सोहळा पाहण्याचे भाग्य मला लाभले. तेव्हा ‘लोकसत्ता’ने ‘तेलवाले काका- एम. जी. सामंत’ अशा मथळ्याची बातमीही प्रसिद्ध केली होती.
– शशिकांत देसाई

प्रांजळांचे कौतुक
सध्या जिकडे तिकडे मोदींविषयींचेच लेख वाचायला मिळतात. अशात के. डी. मालवीय यांच्याविषयीचा लेख खूपच माहितीपूर्ण वाटला. ‘लोकसत्ता’ नेहमीच सच्च्या, प्रांजळ लोकांविषयी आणि समाजातील सकारात्मक काम करणाऱ्यांविषयी माहिती देत असते.
– अमला घोटगे