अतिशय कमी पाण्यात, कमी खर्चात व कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारा शेवगा हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. त्याच्या पानापासून ते बियापर्यंत सर्वच औषधोपयोगी आहे. खर्च वजा जाता एकरी ७० हजार रुपये किमान उत्पन्न देणारे हे वृक्षवर्गीय पीक निश्चितच शेतकऱ्याला आधार देणारे आहे. औसा तालुक्यातील काजळेचिंचोली येथील अरुण पाटील या शेतकऱ्याने फळबागेत आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड केली असून गेल्या दहा वर्षांत फळबागांच्या उत्पन्नापेक्षा शेवग्याचेच उत्पन्न अधिक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

अतिशय कमी पाण्यात, कमी खर्चात व कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारा शेवगा हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. शेवगा आयुर्वेदात बहुपयोगी सांगितलेला आहे. त्याच्या पानापासून ते बियापर्यंत सर्वच औषधोपयोगी आहे. खर्च वजा जाता एकरी ७० हजार रुपये किमान उत्पन्न देणारे हे वृक्षवर्गीय पीक निश्चितच शेतकऱ्याला आधार देणारे आहे.

life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औसा तालुक्यातील काजळेचिंचोली येथील अरुण साहेबराव पाटील या शेतकऱ्यांनी आंबा, चिकू, आवळा अशा फळबागेत आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड केली असून, गेल्या दहा वर्षांत फळबागांच्या उत्पन्नापेक्षा शेवग्याचेच उत्पन्न आपल्याला अधिक मिळाल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले.

प्रामुख्याने आशिया खंडात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या शेवग्याला चमत्कारी वृक्ष म्हणून संबोधले जाते. दक्षिण मध्य भारतात या वृक्षाचा उदय झाला व पाहता पाहता मलेशिया, क्युबा, पाकिस्तान, चीन, सिंगापूर, इजिप्त, जमैका या देशात याची अतिशय उत्तम लागवड झाली. भारतातील सर्व प्रांतांत शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. दक्षिणेत या पिकाला अतिशय महत्त्व आहे. शेवग्याच्या सुमारे १५० पेक्षा अधिक जाती प्रचलित आहेत. शेताच्या बांधावर अथवा परसबागेत या झाडाला पूर्वापार स्थान होते. आता शेवग्याचीच शेती करणारी अनेक शेतकरी मंडळी आहेत. या झाडातील आयुर्वेदिक गुणधर्मामुळे याचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत प्रामुख्याने शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. पानांची पावडर, बियांची पावडर, बियांपासून तयार होणारे तेल यांसारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनवता येतात व त्याला जगभरातून चांगली मागणी आहे. शेवग्याच्या पानाच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबवण्यासाठी पोषक आहार म्हणून केला जातो. शेवग्याच्या बियांपासून जे तेल निघते त्याला बेन ऑइल म्हणून संबोधले जाते. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरले जाते. मोबाइल, घडय़ाळ, टीव्ही इत्यादीत याचा वापर होतो. याच्या एक लिटर तेलाची किंमत २५ हजार रुपये आहे. वाळलेल्या शेवगा बियांची पावडर ही पाणी र्निजतुक करण्यासाठी जगभर वापरली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १ हजार लिटर पाणी र्निजतुक करण्यास शेवग्याच्या बियांची ८०० ग्रॅम पावडर वापरावी, असे सुचवले आहे. आफ्रिकेत पाणी शुद्धीकरणासाठी शेवग्याचा सर्रास वापर केला जातो.

शेवग्याची लागवड ही कोणत्याही हवामानात करता येते. २५ ते ३० डिग्री तापमान शेवग्याच्या वाढीला पोषक असते. ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमान असल्यास फूलगळ होते. हलक्या व माळरान जमिनीत शेवग्याची लागवड करता येते. जमिनीचा पोत पाहून ६ फुटांपासून ते १० फूट अंतरावर शेवग्याची लागवड करता येते. महाराष्ट्रात गेल्या १० ते १५ वर्षांपासून शेवग्याची व्यापारी लागवड केली जाते. राज्यातील सर्व विभागांत ही लागवड होत आहे. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी थोडेबहुत पाणी आवश्यक आहे. या झाडाचे वैशिष्टय़ म्हणजे मार्च, एप्रिल व मे महिन्यात अजिबात पाणी मिळाले नाही तरी हे झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न कमी होते. वर्षभर पाणी असलेल्या ठिकाणी नोव्हेंबर ते जून या कालावधीत उत्पन्न चांगले मिळते. कोकणात सप्टेंबर, ऑक्टोबरपासून ते मार्चपर्यंत लागवड केली जाते. एकरी ४३५ झाडे एका एकरमध्ये हलक्या जमिनीत बसतात. मध्यम व चांगल्या प्रतीच्या जमिनीत ६०० झाडांची लागवड करता येते. जाफना, रोहित १, कोकण रुचिरा, पीकेएम १, पीकेएम २ या वाणांना राज्यात चांगली मागणी आहे. याशिवाय दत्त शेवगा कोल्हापूर, शबनम शेवगा, जीकेव्हीके १, जीकेव्ही ३, चेनमुिरगा, चावा काचेरी, कोईमतुर अशा अनेक जाती आहेत. अधिक उत्पादन, चांगली चव व लांब शेंग यादृष्टीने पीकेएम २ या जातीचे उत्पादन सर्वसाधारणपणे घेतले जाते.

उत्पादन घेतल्यानंतर दरवर्षी झाडाची छाटणी करावी लागते. जमिनीपासून तीन ते सव्वातीन फूट इतकेच झाड ठेवून बाकी झाडाची छाटणी करावी लागते, त्यामुळे नव्या फांद्या फुटतात व त्याला चांगली लागण असते. या पिकाला अतिशय अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. िनबोळी पेंड, गांडूळ खत, सेंद्रिय खत याचा वापर अधिक करावा, असे अनुभवी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांतच एका झाडाला सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात, तर दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात. एका झाडाला सरासरी १० वष्रे चांगले उत्पादन मिळते. सर्व खर्च वजा जाता एकरी किमान ६० हजार ते ८० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.

औसा तालुक्यातील काजळीचिंचोली या गावचे अरुण साहेबराव पाटील या शेतकऱ्याचे शिक्षण केवळ नववीपर्यंतचे. साडेसत्तावीस एकर जमिनीत त्यांनी विहीर घेतली, िवधन विहीर घेतली, शेततळेही आहे. २००६-०७ साली त्यांनी उसाच्या शेतीऐवजी आंबा, चिकू, आवळा अशी फळबाग केली व या फळबागेत आंतरपीक म्हणून शेवगा घेण्याचा निर्णय घेतला. जमीन हलक्या प्रतीची असल्यामुळे त्यांनी दोन रोपामधील अंतर ११ फूट ठेवले व एका एकरात केवळ ३४० झाडे बसली. त्यांच्या दहा एकरात आता ३ हजार ४०० झाडे आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांना ५ रुपये किलोपासून १५० किलोपर्यंतचा भावही मिळाला आहे, मात्र सर्वसाधारणपणे एकरी ६० ते ७० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. यावर्षी पाण्याची प्रचंड अडचण झाली. आठवडय़ातून एकदा ठिबक सिंचनाने पाणी देऊनही दहा एकरवरील शेवगा जगला. एक एकर ऊस शेतीला जितके पाणी लागते तेवढय़ा पाण्यात १० एकरवरील शेवगा जगवता येतो. कमी पाणी लागणारे हे पीक असून शेतकऱ्यांनी आता अशा पिकांकडे वळले पाहिजे. दहा वर्षांपूर्वी आपण दूरदृष्टी ठेवून शेवग्याची लागवड केली त्यामुळेच अशा दुष्काळातही तग धरल्याचे अरुण पाटील यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात नगर जिल्हय़ातील दुष्काळी भागात कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना शेवग्याच्या लागवडीसाठी मार्गदर्शन केले व तेथील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले. गेल्या काही वर्षांत मराठवाडय़ातील शेतकरीही मोठय़ा प्रमाणावर शेवग्याची शेती करण्याकडे वळत आहेत. शेवग्याची लागवड करताना अनेक मंडळी आपलीच शेवग्याची जात कशी उत्कृष्ट आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. लागवड करताना वाणाचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्याचा लाभ अधिक होऊ शकतो.

विविध आजारांवर गुणकारी

कोणत्याही हवामानात शेवग्याचे उत्पन्न घेतले तरी स्थानिक बाजारपेठेतच त्याला चांगली मागणी आहे. बाजारपेठेत जास्त माल आला तर पुणे, मुंबई, हैद्राबाद अशा ठिकाणी माल पाठवूनही नुकसान होत नाही असा आपला अनुभव असल्याचे पाटील म्हणाले. शेवग्यावर विविध प्रकारचे रोग पडतात. त्यात प्रामुख्याने करपा, कीड अळी, जाळी अळी, शिवाय शेंगांवर चिकटा पडतो. कीटकनाशकाने हे रोग दूर होतात. मुळात वृक्षाची स्वतची क्षमता चांगली असल्यामुळे तग धरण्यास फारशी अडचण येत नाही. शेवग्याचा आयुर्वेदिक वापर विविध आजारांत केला जातो. ताप, संधिवात, डायरिया, दृष्टिदोष, हृदयरोग, मधुमेह, भूक न लागणे अशा विविध आजारांवर शेवग्याचा उपयोग केला जातो. ‘आयर्न टॉनिक’ म्हणूनही याचा वापर केला जातो. बिहार प्रांतात आपल्याकडे शेडनेट शेतीसारखा शेवग्याचा वापर केला जातो. साधारणपणे झाडाच्या सावलीखाली दुसरे पीक घेता येत नाही असा शेतकऱ्याचा अनुभव आहे. मात्र शेवग्याच्या सावलीत दुसरे पीक २५ टक्क्यांपेक्षा अधिक जोमाने येते. शेवग्याच्या सावलीचा उपयोग हा शेडनेटसारखा होतो असा बिहारमधील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मधुमक्षिकापालन करणारे शेतकरीही शेवग्याला अधिक पसंती देतात, कारण यामुळे शेतीतील अन्य पिकांचे परागीकरण वाढते व त्यातून उत्पन्नही वाढते.

pradeepnanandkar@gmail.com