सातारा-पुणे महामार्गावरील नसरापूर फाट्यावर एक गॅस टँकरला अपघात झाला आहे. यावेळी टँकरमधील वायू गळती सुरू झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक निरेमार्गे वळविण्यात आली होती. मात्र, आता बंद करण्यात आलेली वाहतूक टँकर हटविल्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास पूर्ववत झाली आहे.
आज पहाटे नसरापूर फाट्याजवळ गॅस टँकर पलटी झाला. अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ती कमी करण्यासाठी आणि या टँकरमधून गॅस गळती होत असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक नीरामार्गे वळविली होती. पण  अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून, गॅस गळती रोखत टँकर हटविला.
तर दुसरीकडे, खंबाटकी बोगद्याजवळ दोन खासगी बसेसची समोरसमोर जोरदार धडक बसली. त्यामध्ये ठाण्यातील दिपक निकम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही बसमधील मिळून ३७ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.