मालवण कालावल खाडीतील वाळू उपसा प्रश्नासंदर्भात कायदेभंग आंदोलन करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्यासह १४ जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने या सर्वांना सशर्त जामीन मंजूर केला. या सर्वांना पुढील एक महिना आठवड्यातून दोन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेतील संशयित आरोपी मंगळवारी दुपारी मालवण पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. मालवण कालावल खाडीतील वाळू उपशा संदर्भातील महसूल विभागाच्या नियमांमुळे वाळू व्यावसायिक त्रस्त झाले होते. महसूल विभागाने कालावल खाडीतील वाळू उपशावर निर्बंध आणले होते. यावेळी वैभव नाईक यांनी कायदेभंग आंदोलन करून डंपरमध्ये वाळू भरून पाठवले होते. मालवण तहसिलदारांनी २८ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे यांनी या घटनेला वर्ष होत आले तरी या प्रकरणी पोलीस कारवाई करीत नाहीत म्हणून टीका केली होती. विधीमंडळातही त्यांनी हा विषय मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

Patanjali Expresses Regret
एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
AAP MP sanjay Singh (1)
Delhi Liquor Scam: ‘ईडी’ने हरकत न घेतल्याने ‘आप’ नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता