22 August 2017

News Flash

Maratha Kranti Morcha LIVE: देता की जाता…मोर्चेकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोर्चाला पाठिंबा

मुंबई | Updated: August 9, 2017 3:08 PM

सकाळी अकरा वाजता भायखळातील जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात झाली.

‘एक मराठा, लाख मराठा’…मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण देता की जाता…असा आवाज आज मुंबईत घुमला. राज्यभरात ५७ मोर्चे काढले आहेत. मुंबईतील हा अखेरचा मोर्चा असणार आहे. त्यामुळं आता आरक्षण देता की जाता, असा निर्वाणीचा इशाराच मराठा क्रांती मूक मोर्चातून सरकारला देण्यात आला. मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज मुंबईत सकाळी मराठा समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला.  भायखळा येथून मोर्चाला सुरूवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झालं. यावेळी व्यासपीठावर तरुणी आणि मुलींची भाषणे सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं त्यांनी भाषणातून सांगितलं.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी  समाजाच्या वतीनं शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं.  या शिष्टमंडळात मराठा समाजातील सहा मुलींचा समावेश होता. त्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. सरकारकडून ठोस उत्तर मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळात सहभागी झालेल्या मुलींनी व्यक्त केला.

 

LIVE UPDATES:

०३.०५: शिष्टमंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले

०२:१८: शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देणार

०२:१७: मराठा समाजातील तरुणींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनात

०१:३६: आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही: तरुणींनी मांडली व्यथा

०१: ३४: मराठा समाजाला आरक्षण देता की जाता, तरुणींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

०१:२८: मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजातील तरुणींची मागणी

०१:१६: आझाद मैदानात मोर्चात सहभागी झालेल्या तरुणी निवेदन वाचून दाखवत आहेत.

१२:३४: मराठा मोर्चा आझाद मैदानात दाखल.

१२:२७: मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण घोषणा करणार: दानवे (टीव्ही वृत्त)

१२: १५: मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा – नितेश राणे

१२:१४: मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे – निलेश राणे

१२:०८: मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ पोहोचला.

१२:०४: काँग्रेस नेते निलेश राणे मोर्चात सहभागी.

 

 

११:३०: शिस्तबद्धपणे मोर्चेकरी आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ

११:२४: मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांच्या स्वागतासाठी राजकीय पक्षांनी लावलेले फलक मोर्चेकरांनी हटवले.

११:०७: भाजप नेते आशीष शेलार यांनी आझाद मैदानात येण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांना विरोध दर्शवला, पण धक्काबुक्की झाली नाही: आयोजक

११:०१: भायखळा येथील जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात. मोर्चात लाखो बांधव सहभागी.

१०:४०: मरीन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटीदरम्यान वाहतूक कोंडी.

०९:१९: मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईत आज टोलमाफ

०८:३०: पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, ठाण्यात आनंदनगर टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी

०७:४९: मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

०७: ४५: लोकल ट्रेनमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना.

०७:४०: राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील बांधव मुंबईत पोहोचले.

First Published on August 9, 2017 7:38 am

Web Title: maratha kranti morcha 2017 in mumbai live updates jijamata udyan to azad maidan wednesday maharashtra
 1. H
  Hinu
  Aug 9, 2017 at 11:55 pm
  झुंडशाहीचा विजय असो
  Reply
 2. J
  jitendra kshirsagar
  Aug 9, 2017 at 5:30 pm
  हा विचार " nota against ऑल parties " २०१९ पर्यंत रुजायला वेळ लागणार नाही . सगळ्या पार्ट्याबद्दल तेच मत आहे. नाहीतर ५० लोक मतदान करत नाहीत . त्यांनी NOTA वापरून बघावा . आणि जे मतदान करतात त्यांनी पण NOTA वापरावा . सिस्टिम बदलली पाहिजे लवकरच हा विचार प्रत्येक भारत प्रेमींच्या मनात आहे .
  Reply
 3. H
  hemant kulkarni
  Aug 9, 2017 at 5:00 pm
  मराठा समुदायाला १९९९ ते २०१४ अशी पंधरा वर्षे त्यांच्या हक्कांची जाणीव कशी काय नाही झाली बर . तो बारामतीतील धनगर बोंबलला कि मगच कशी जाग आली ? ते हि जाऊ दे, शेवटी त्यांना स्वतःचे काही कर्तृत्व नाही हेच आरक्षणाच्या मागणीवरून सिद्ध होते. सरकारने दिलेल्या सवलतींवर ते जगू शकतात. महाराजांसारख्या शूर पुरुषाच्या पुण्याईवर जगत आलेल्या ह्या समुदायाने शेवटी सर्वात सोपा मार्ग निवडला. सरकारी अनुदाने, आरक्षणे ह्याने देशाची पीछेहाटच होते.
  Reply
 4. P
  pravin
  Aug 9, 2017 at 4:08 pm
  Fakt मराठ्यांना द्या ata 70 varshe आरक्षण आता amchi वेळ aliy mg kalel.कसा त्रास होतो ते.
  Reply
 5. H
  harshad
  Aug 9, 2017 at 3:40 pm
  v. P. Singh. ह्यांना पाठिम्बा देऊन आणि मंडल आयोग लागू करून किती मोठी घोडचूक आपण केली हे आता बीजेपी च्या लक्षात येत असेल. बिहार व Up. मधून काँग्रेस ला संपवण्यासाठी मंडल आयोगाचा वापर केला आता तोच भस्मासुर बीजेपी वर उलटला आहे. मग ते Maharashtra मधील Maratha आंदोलन असो किंव्हा गुजरात मधील पटेल किंव्हा हरियाणा मधील jat. आंदोलन असो.
  Reply
 6. R
  rahul musale
  Aug 9, 2017 at 3:12 pm
  सत्य हे आहे कि ज्यांनी आरक्षणाचा लाभ पिढ्यानपिढ्या मिळवला आहे आणि ते सोडण्यास त्यांचा नकार आहे... त्यांना आरक्षण म्हणजे मूल गरज असण्याची सवय झाली आहे...
  Reply
 7. M
  Milind P.
  Aug 9, 2017 at 3:05 pm
  आरक्षणाला पाठिंबा देणारी शिवसेना बाळासाहेबांची नाही. हि तर संधी साधू सेना.
  Reply
 8. M
  malavadkar
  Aug 9, 2017 at 2:34 pm
  आरक्षण देऊन केलेल्या चुकीचा पश्चाताप अजून बाबासाहेबाना होत असेल ! बहुसंख्य समाजाने अल्प संख्यांकावर अत्याचार करू नयेत !
  Reply
 9. रोहिदास
  Aug 9, 2017 at 2:13 pm
  मूक मोर्चा आहे तर तेथे आझाद मैदानात काही मुली पाठ केलेल्या भाषणाची पोपटांची का करत होत्या...सत्य काय आहे ??
  Reply
 10. R
  Ramdas Bhamare
  Aug 9, 2017 at 1:21 pm
  मागील अनुभव असा आहे की मराठा मोर्चा नंतर भाजपचा मतदानाचा टक्का वाढला आहे , जागाही वाढल्या आहेत त्यामुळे आज भाजपावाले मनातल्या मनात साजूक तुपातील मांडे खात असतील .
  Reply
 11. N
  Nitin Deolekar
  Aug 9, 2017 at 1:21 pm
  न होत नाही आणि सान्गताबी येत नाय !! अश्या आरक्षणाच्या लई अवघड जागच्या लई जुन्या दुखण्यावर रामबाण इलाज !! गेल्याच महिन्यात पुण्यात कुणी सोनावणे नावाचे पोलीस हवालदार-साहेब एक-रकमी २५हज्जार खाताना रंगे-हात पकडले गेले? पिढ्यान पिढ्या आरक्षण घेऊन वर परत लज्जस्पद भ्रष्ट्राचार करणारे लोकांनी देशाची मान खाली घातली आहे? केवळ जातीचे आधारावर दिलेले अतिरेकी आरक्षण जरा तरी कमी करणे अतिशय आवश्यक आहे? सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 50 मर्यादा सर्व जातीना लावा. एससी,एसटी,बीसी आरक्षण निम्मे करा मग मराठा-मुस्लिम-ब्राह्माण जातीतील महिला-गरीबना निदान 5-5 आरक्षण देता येईल!! आरक्षण गुण फक्त 5 गुण वाढवा. उरल्या जागा ओपन करा. म्हणजे किमान गुणवत्ता कायम राहील!! मे ल ओपन जागा जर 95 ला बंद तर आरक्षण 90 ला बंद करा. उरल्या जागा ओपन करा. सरकारी नोकरीत ही हेच नियम लागू लारा. लग्गेच..भ्रष्टाचार करणारे सरकारी नोकर शोधून जबर शिक्षा करा.. आरक्षण घिऊन शान परत वर भ्रष्टाचार केल्यास फकस्त फाशीच व्हायला पायजेल हाय.. अन ती बी -कुटुंब -परिवार !! अगदी अनिष्ट मित्रां ..
  Reply
 12. R
  rup
  Aug 9, 2017 at 12:55 pm
  मराठा समाजाला १०० आरक्षण मिळालाच पाहिजे ....नाहीतर स्वतः शरद पवार आत्मदहन करतील ....
  Reply
 13. S
  Sanjay Marathe
  Aug 9, 2017 at 12:19 pm
  GOVT NEED FATKE. LET 2019 ELECTION COME. PL USE NOTA AGAINST ALL PARTIES
  Reply
 14. V
  vaibhav salekar
  Aug 9, 2017 at 11:49 am
  साऱ्या देशाला कळेल मराठ्याची टाकत आणि समाजाची होत असलेली गळचेपी शिक्षण आणि नोकरी मध्ये होत असलेली गळचेपी आता बस झाली ओपन कॅटेगेरी नाती तर मराठ्याची दुर्दशा होईल
  Reply
 15. V
  varad
  Aug 9, 2017 at 11:42 am
  मराठा नम्र झाला म्हणजे तो गडगडला नाही आणि ज्याच्या विरोधात गेला त्याला परवडला नाही
  Reply
 16. S
  Shriram Bapat
  Aug 9, 2017 at 11:39 am
  हवे आहे त्या प्रमाणात आरक्षण मिळाल्यावर पुढील दहा वर्षात एकूण किती मराठा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, एकूण किती मराठा बेरोजगारांना आरक्षणातून नोकरी मिळणार आहे याचा अंदाज घ्यावा. असा दहा वर्षातील लाभार्थींचा आकडा मोर्चेकऱ्यांच्या एकूण संख्येच्या एक टक्का भरला तरी बाकीच्या ९९ टक्क्यांचे दिलेल्या पाठिंब्यासाठी अभिनंदन करता येईल.
  Reply
 17. T
  tatya
  Aug 9, 2017 at 11:27 am
  बहुसंख्य समाज आरक्षणा आधारे अल्प संख्य समाजावर अत्याचार करणार असेल तर रक्त रंजित क्रांती अटळ आहे !
  Reply
 18. V
  Vikas
  Aug 9, 2017 at 10:26 am
  मराठा मूक मोर्च्यांमधून काय साध्य होणार? आरक्षण काही गरिबी हटाव योजना नाही, हे सर्व प्रथम ध्यानात घ्यावयास हवे. आर्थिक आरक्षण ही निव्वळ पोपटपंची आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण मिळणे कदापि शक्य नाही. समाजाची जर आर्थिक घडी सावरायची असेल तर उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी, तसेच शिक्षणासाठी कर्जपुरवठा अगदी कमी व्याजदरावर मिळणे गरजेचे आहे. ब्राह्मण समाज सोडून बाकीच्या सर्वांचे आरक्षण बंद करावयास हवे आणि फक्त ब्राह्मण समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात (३.५ ) आरक्षण द्यावयास हवे. मात्र उर्वरित ९६.५ जागांवर त्यांना हक्क सांगता येणार नाही, अशी तजवीज करायला हवी, म्हणजे बाकीच्या समाजांसाठी आरक्षण ठेवण्याची वेळच येणार नाही. सध्या खुल्या वर्गातील ९० पेक्षा जास्त जागा यांनीच बळकाविलेल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
  Reply
 19. V
  Vikas
  Aug 9, 2017 at 10:19 am
  मराठा मूक मोर्च्यांमधून काय साध्य होणार? आरक्षण काही गरिबी हटाव योजना नाही, हे सर्व प्रथम ध्यानात घ्यावयास हवे. आर्थिक आरक्षण ही निव्वळ पोपटपंची आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण मिळणे कदापि शक्य नाही. समाजाची जर आर्थिक घडी सावरायची असेल तर उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी, तसेच शिक्षणासाठी कर्जपुरवठा अगदी कमी व्याजदरावर मिळणे गरजेचे आहे. ब्राह्मण समाज सोडून बिकी सर्वांचे आरक्षण बंद करावयास हवे आणि फक्त ब्राह्मण समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात (३.५ ) आरक्षण द्यावयास हवे. मात्र उर्वरित ९६.५ जागांवर त्यांना हक्क सांगता येणार नाही, अशी तजवीज करायला हवी, म्हणजे बाकीच्या समाजांसाठी आरक्षण ठेवण्याची वेळच येणार नाही. सध्या खुल्या वर्गातील ९० पेक्षा जास्त जागा यांनीच बळकाविलेल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
  Reply
 20. B
  babban kanda
  Aug 9, 2017 at 9:58 am
  रिकामचोटांचा मोर्चा..
  Reply
 21. P
  pravin
  Aug 9, 2017 at 8:42 am
  महाराष्ट्रात मराठा जातीने माेर्च्याचे स्वरूप स्वजातीचे न ठेवता मराठी भाषिक असे ठेवायला हवे. भारतात भाषिक राज्य निर्माण करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून मराठी भाषिक वर्गाची आर्थिक परिस्थितीत काय फरक पडला याचा अभ्यास हा व्हायला हवा हाेता. शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप बदल हे व्हायला हवे हाेते. आज तांत्रिक प्रगतीमुळे कुठल्याही कामात मानवी हस्तक्षेप कमी होत चालला आहे त्याचा नाेकरी मिळण्यावर परिणाम हा हाेणार आहे. .प्रवीण म्हापणकर
  Reply
 22. Load More Comments