भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापन दिन धुळ्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर पोलिसांचे संचलन आणि शालेय विद्यार्थ्यांसह कलावंताचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

याप्रसंगी भुसे यांनी उपस्थितांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पालिका आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. आदी उपस्थित होते. परेड कमांडर तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवंदना देवून संचलन केले. संचलनात राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ६, जिल्हा पोलिस दल, पोलिस प्रशिक्षण केंद्र, महिला कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, वन विभाग, राष्ट्रीय छात्रसेनेच्या ४८ महाराष्ट्र बटालियनचे छात्र, कनोसा इंग्लिश मीडियम स्कूल, जो. रा. सिटी हायस्कूल, धुळेचे राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, मोराणे सैनिक स्कूलचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, धुळे एसएसव्हीपीएसचे विद्यार्थी, जिजामाता हायस्कूल, श्री जी इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू नॅशनल उर्दू हायस्कूल, सिंधुरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, कमलाबाई हायस्कूल, जिल्हा पोलिस दलाचे बॅण्ड पथक, श्वान पथक, पोलीस दलाची वाहने आदी सहभागी झाले. या निमित्त पोलिस कवायत मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यRम झाले. त्यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅफिक कवायत’ सादर केली. देशभक्तीपर गीते, मल्लखांबची प्रात्यक्षिके, आदिवासी नृत्य, अल्टो सॅक्सो फोनवर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले.

impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज

तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजासोहळाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. यावेळी इनरव्हील क्लबने सैनिक कल्याण निधीस दहा हजार रुपये मदतीचा धनादेश दिला. यावेळी ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्ष आणि विविध ठिकाणी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.