केंद्र शासनाने देशात जलमार्गावर प्रवासी वाहतुक सुरु करण्याचे धोरण स्वीकारले आहे.  देशातील १४ राष्ट्रीय जलमार्गाना मान्यता दिली आहे. त्यातील ७ जलमार्ग महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील आहेत. रायगडातील धरमतर, राजपुरी, कुंडलिका या तीन खाडय़ांबरोबरच रायगड व रत्नागिरी दरम्यानच्या  सावित्री खाडीत जलवाहतूक करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या नवीन धोरणांमुळे कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी बोटींची वाहतूक सुरु होईल. असे झाल्यास कोकणातील बंदरे परत एकदा गजबजून जातील आहे.  जलवाहतुकीचे प्रमाण वाढल्यास रोजगारनिर्मितीसह महसुली उत्पन्नातही वाढ होईल . रायगड जिल्ह्यत पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल .

केंद्र शासनाने  देशातील १४ राष्ट्रीय जलमार्गाना मान्यता दिली आहे. त्यातील ७ जलमार्ग महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील आहेत. रायगड जिल्ह्यतील  अंबा नदी (धरमतर खाडी )(एनडब्ल्यू -१०),  राजपूरी खाडी (एनडब्ल्यू -८३), कुंडलिका नदी – रेवदंडा खाडी (एनडब्ल्यू -८५) या जलमार्गाचा राष्ट्रीय जलमार्गामध्ये सामावेश करण्यात आला आहे. सावित्री नदी – बाणकोट खाडीचा (एनडब्ल्यू -८९) देखील याच योजनेत सामावेश करण्यात आला आहे.

या तीनही खाडय़ांमध्ये  पूर्वी प्रवासी तसेच मालाची वाहतूक केली जात असे.  यावर रोहा , नागोठणे, धरमतर, रेवदंडा, रेवस ही प्रमुख बंदरे होती.  शिवाय रायगड व रत्नागिरी दरम्यान असलेली बाणकोटची खाडी जलप्रवासासाठी महत्वपूर्ण ठरत असे . या खाडीकिनारी असलेली दासगाव , म्हावप्रळ , वेश्वी या बंदरांमुळे दोन्हीा जिल्हे जलमार्गाने जोडले गेले होते.  परंतु पुढे या खाडय़ांवर पूल तयार झाले आणि हे जलमार्ग अडगळीत पडले. आता या जलमार्गाचा पुन्हा  विकास होणार आहे .

रायगड जिल्ह्यतील तीन जलमार्गाचा तांत्रिक व व्यवहारिक अभ्यास करण्यासाठी वॅपकॉप्स या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई – धरमतर (एनडब्ल्यू -५३) ,राजपूरी खाडी (एनडब्ल्यू -८३) अंतिम अहवाल पूर्ण झाला आहे. तो लवकरच सरकारला सादर केला जाणार आहे.  रेवदंडा व बाणकोट खाडीचा खाडीचा  तांत्रिक व व्यवहारिक अभ्यास करण्यासाठी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्रधिकरणने गुरगाव येथील  ट्रकटेबल कंपनीला नियुक्त केले आहे.  भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्रधिकरणाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला राष्ट्रीय जलमार्ग विकसीत करण्याविषयी आराखडा सादर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने (बंदरे व परिवहन) मान्यता दिली आहे.

केंद्र शासनाने देशात जलमार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील १४ राष्ट्रीय जलमार्गाना मान्यता दिली आहे. त्यातील तीन जलमार्ग रायगड जिल्ह्यत आहेत. याशिवाय मुंबई (भाऊचा) धक्का  ते मांडवा दरम्याजन रो-रो सेवा सुरू करण्यात  येणार आहे. त्यासाठी मांडवा जेटीनजीक ब्रेक वॉटरचे काम सध्या  युद्घापातळीवर सुरू आहे .  हे काम पूर्ण झाल्यानंतर  मुंबई ते अलिबाग (मांडवा) अशी बारमाही प्रवासी जलवाहतूक सुरू होणार आहे .  या जलमार्गामुळे  प्रवास वेगाने होईल व रायगड जिल्ह्यत पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल .