केवळ महिलांमध्येच नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांमध्ये ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका सध्या खूप लोकप्रिय ठरली आहे. सध्या मालिका ज्या वळणावर आहे, त्यामुळे श्री आणि जान्हवीचे लग्न होणार की नाही, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण मालिका पाहणाऱ्या आणि श्री-जान्हवी या जोडीवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी एक खुशखबर असून श्री आणि जान्हवीचे शुभमंगल झाले आहे. अखेर जान्हवी गोखले घराण्याची सून होणार आहे. लग्नाच्या या भागाचे प्रसारण येत्या २० ऑक्टोबर रोजी वाहिनीवरून करण्यात येणार आहे. रविवारी मालिकेचा खास महाएपिसोड दाखविण्यात येणार असून त्यात श्री-जान्हवीच्या लग्नाचा हा सोहोळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.