टीव्ही अभिनेता कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्या प्रेमाची चर्चा गेले काही महिने सुरु होती. सर्वत्र खुलेआम आपल्या प्रेमाची कबुली देणारे हे प्रेमीयुगुल आता वेगळे झाले आहेत. कुशाल टंडनने याबाबतचे ट्विट केले आहे.
आता गौशाल ही जोडी एकत्र दिसणार नाही. मला आमच्या ब्रेकअप बद्दल सांगताना दुःख होत आहे. आम्ही दोघेही आता वेगळे झालो आहोत, असे कुशालने टि्वट केले आहे. या दोघांचेही चाहते त्यांना गौशाल असे संबोधित करायचे. ‘गौशाल’ हे गौहर आणि कुशालच्या नावापासून तयार करण्यात आलेले होते. गेल्यावर्षी झालेल्या ‘बिग बॉस’च्या पर्वात हे दोघे जवळ आले होते. त्यानंतर त्यांनी ‘खतरो के खिलाडी ५’मध्येही भाग घेतला होता. तसेच, अनेक ठिकाणी ते एकत्रचं फिरायचे. दोघांनी गोव्यात सुट्टीदेखील साजरी केलेली. इतकेच नाही तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पाकिस्तानी गायक उस्ताद राहत फतेह अली खानचा अल्बम ‘जरुरी था’मध्येही काम केले होते.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!