बॉलिवूड बादशहा शाहरुख खानला यंदाच्या वर्षीचा राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेल्या तीनवर्षापासून यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी झालेल्या तीन पुरस्कारांवर बिग बी अमिताभ बच्चन, गान कोकिळा लता मंगेशकर आणि रेखा या दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदाच्या चौथ्या वर्षी शाहरुख खानने नुकताच रेखा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारत महानायक अमिताभ यांच्याशी बरोबरी केली. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या यादीत आता शाहरुखचा समाविष्ट झाला आहे. शाहरुख खान आणि यश चोप्रांचे खूप चांगले संबंध होते. यश चोप्रांच्या ‘दिल तो पागल है’, ‘वीर जारा’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटात शाहरुखने भूमिका केली आहे.‘जब तक है जान’ या शाहरुखसोबतच्या चित्रपटानंतर यशचोप्रा यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली होती ‘जब तक है जान’ हा त्यांचा २२ वा चित्रपट होता.

Shah Rukh Khan ,Yash Chopra Award,शाहरुख खान, रेखा, यश चोप्रा अभिनेत्री रेखा यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खान[/caption]

 

शाहरुखने हा पुरस्कार स्वीकारताना यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आभार व्यक्त करताना शाहरुख म्हणाला की, ही रात्र माझ्यासाठी खास अशीच आहे. चोप्रा यांनी मला घडविले आहे. चोप्रा नसते तर मी नसतो. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी शाहरुखने प्रसारमाध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. मी या पुरस्कारास पात्र नाही, मात्र परिक्षकांनी माझी निवड केल्यामुळे आनंद झाला आहे. यावेळी त्याने परिक्षकांचेही आभार मानले. पुरस्कार वितरण समितीमध्ये यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा, बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी, अनिल कपूर. सिमी ग्रेवाल, आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा समावेश होता.

srk-22

शाहरुख नकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ चित्रतपटाच्या यशामुळे फारच आनंदीत आहे. या चित्रपटानंतर शाहरुख इम्मियाज अली यांच्या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मासोबत तो स्क्रिन शेअर करताना दिसेल. ‘रईस’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला शाहरुख हॉलिवूडमधील एका मालिकेमध्ये देखील झळकणार आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्राची अमेरिकन टीव्ही शोमध्ये वर्णी लागल्यानंतर आता बादशहा शाहरुख खान अमेरिकन टिव्ही शोमध्ये झळकणार आहे. सायन्स फिक्शन डिटेक्टीव शो- डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ साठी शाहरुखला निमंत्रण आले आहे. विशेष म्हणजे ट्विटरवरुन आलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन शाहरुखने अमेरिकेला जाण्याचे संकेत दिले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून शाहरुखला या सिरिजच्या मालिकेत पाहुणा म्हणून बोलविण्यात आले होते.