शाहरुख खाननंतर आता ‘द कपिल शर्मा शो’मधून आता अजून एक टीम चित्रीकरण न करताच परतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुबारका’ सिनेमाची टीम ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेली होती. चार तास कपिलची वाट बघूनही तो आला नाही, शेवटी त्यांनी तिथून निघणंच पसंत केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कपिलची तब्येत बिघडल्यामुळे तो सेटवर येऊ शकला नव्हता. त्यामुळे चार तास वाट पाहून ‘मुबारका’ची टीम रिकाम्या हातीच परतली.

जाणून घ्या, कोणत्या देशात किती आहेत बच्चन कुटुंबियांचे बंगले

Eknath shinde and sharad pawar
“मग शरद पवारांवर ही वेळ का आली?” ‘शपथनामा’वरून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, म्हणाले…
girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी हे ठरलेल्या वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता स्टुडिओ येथे पोहोचले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाचे चित्रीकरण संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होणार होते. पण ठरलेल्या वेळेमध्ये कपिल सेटवर आलाच नाही. त्यानंतर त्याला सतत फोनही केले जात होते. फोनवर त्याची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले तसेच तो सेटवर येईल असे आश्वासनही देण्यात आले. पण कपिल रात्री १० पर्यंतही सेटवर आला नाही मग शोच्या टीमने चित्रीकरणच रद्द केले.

काही दिवसांपूर्वी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा त्यांच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये गेले होते. पण कपिलची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या तणावात असलेल्या कपिलची शाहरुख- अनुष्का सेटवर येण्याआधी त्याची तब्येत खालावली आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे चित्रीकरण रद्द करावे लागले होते.

कोणी आपले फोटो काढत असेल तर काय करावे, शाहरुखची सुहानाला हटके टिप्स

‘गेस्ट इन लंडन’ या सिनेमाच्या टीमच्या बाबतीतही काहीसे असेच झाले. तेव्हाही कपिलला अस्वस्थ वाटल्यामुळे कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले होते. कपिलच्या स्वास्थ्याची वाढत चाललेली तक्रार पाहता त्याने संपूर्ण विश्रांती घेऊन कामावर रुजू व्हावे असेच त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असेल हो ना?