अभिनेत्री दिशा पटानीने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ती कुंग फू योगा या सिनेमात दिसली होती. तिच्या पहिल्या सिनेमात तिने सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले तर दुसऱ्या सिनेमात सोनू सूद आणि हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅनसोबत काम केले.

असे असले तरी सातत्याने तिचे नाव टायगर श्रॉफशी जोडले जात आहे. दोघंही एकमेकांना चांगले मित्रच मानतात. असे असले तरी अनेक पार्ट्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. दोघांनी ‘बेफिक्रा’ या म्युझिक अल्बममध्ये एकत्र काम केले आहे. सध्या दिशा तिच्या नृत्याकडे अधिक लक्ष देताना दिसत आहे. नुकताच दिशाने तिच्या नृत्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरलही होत आहे. बऱ्याचजणांनी हा व्हिडिओ शेअर करत दिशाचे नृत्यकौशल्य पाहत त्याला दाद दिली आहे.

दरम्यान, डब्बू रत्नानी या प्रसिद्ध छायाचित्रकाराच्या नव्या वर्षाच्या कॅलेंडरसाठी दिशाने टॉपलेस फोटोशूट केले होते. तिने हा फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केल्यानंतर तिच्या या अवतारावर टीका होत होती. ट्विटरव्यतिरिक्त दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर देखील हा फोटो शेअर केला होता. नशीले डोळे आणि अनोख्या केशरचना या अवतारात दिशाने या फोटोशूटसाठी पोझ दिली होती. टॉपलेस फोटोबद्दल दिशानेही आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘मी टॉपलेस नाही, या फोटोमध्ये फक्त माझी पाठ दिसत आहे. माझ्या शरिराविषयी मला आत्मविश्वास असल्यामुळेच मला ही पोझ देताना समस्या आली नाही.’ असे दिशाने म्हटले होते.

गतवर्षीच्या कॅलेंडरसाठी डब्बूने २४ सेलिब्रेटींचे फोटोशूट केले होते. यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट, परिणीति चोपड़ा, सोनाक्षी सिन्हा, सनी लिओनी, अनुष्का शर्मा, जॅकलीन फर्नांडीस, श्रद्धा कपूर आणि क्रिती सॅनॉन या अभिनेत्रींचा समावेश होता. डब्बू रत्नानीने त्याचे सेलिब्रिटी कॅलेण्डर लॉन्च केले तेव्हा विविध बॉलिवूड सेलिब्रिटींनी या कॅलेण्डर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली होती. रेखा, शाहरुख खान, सन्नी लिओनी, टायगर श्रॉफ, वरुण धवन, क्रिती सेनॉन आणि बऱ्याच सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.