कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामधील वाद चर्चेत असतानाच आता कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या अस्तित्वावर टांगती तलवार आली आहे. सुनीलच्या कार्यक्रमातून जाण्यामुळे त्याचा या शोच्या टीआरपीवरही परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. कपिलच्या कार्यक्रमासह इतरही विनोदवीरांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. विविध धाटणीच्या मालिकांच्या गर्दीतही विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांवर चांगलीच पकड बनवली. याचाच प्रत्यय नुकताच सेलिब्रिटींच्या आगाऊ करभरणा यादीतही पाहायला मिळाला. सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार या सेलिब्रिटींच्या यादीत कपिल शर्माच्या नावाचाही समावेश आहे. टेलिव्हिजनवरील विनोदी कार्यक्रम, विविध शो, इव्हेंन्ट्सना हजेरी लावत टिव्ही विश्वातील हे कलाकार गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच मानधन मिळवत आहेत.

कपिल शर्मा – कपिल शर्मा वर्षभरात जवळपास ३०.६७ कोटी रुपयांची कमाई करतो. गेल्या वर्षभरामध्ये त्याने केलेल्या कमाईचा आकडा पाहता परफेक्शनिस्ट आमिरलाही त्याने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केलेल्या आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल कार्यक्रमाच्या एका भागासाठी ७०-८५ लाख रुपयांचे मानधन आकारतो. कपिलच्या खुमासदार शैलीमुळे सध्या हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या क्रार्यक्रमाव्यतिरिक्त विविध ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्ये काम करुनही कपिल बरीच कमाई करतो. कपिलचा सध्याचा कमाईचा आकडा पाहिला तर आलिया भट्ट, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांनाही त्याने मागे टाकले आहे.

kapil-sharma-smile-wallpaper

कृष्णा अभिषेक – कमाईच्या बाबतीत कपिल मागोमाग भारतीय टेलिव्हिजन विश्वात विनोदवीर कृष्णा अभिषेकचे नाव घेण्यास हरकत नाही. ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या क्रार्यक्रमातील आक्षेपार्ह विनोदी शैलीमुळे कृष्णावर अनेकदा टीका करण्यात आल्या असल्या तरीही त्याचा वेगळा असा एक चाहतावर्ग आहे. कार्यक्रमाच्या एका भागाच्या चित्रिकरणासाठी कृष्णा ३८ ते ४० लाख रुपयांचे मानधन घेतो.

krushna-abhishek

भारती सिंग – नेमबाजीच्या खेळात पारंगत असणारी पंजाबी कुडी भारती सिंग सध्या तिच्या विनोदी अंदाजानेही अनेकांचीच मनं जिंकत आहे. कपिल आणि कृष्णासोबतच विनोदी कलाकारांच्या कलाविश्वात भारतीचेही नाव घेतले जाते. टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या एका भागासाठी ती २५-३० लाख रुपयांचे मानधन घेते. इतकेच नव्हे तर ‘नच बलिये’च्या आठव्या पर्वासाठी भारतीने सर्वाधिक मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. ‘नच..’च्या एका भागासाठी तिने ३० लाख रुपयांचे मानधन घेतले आहे. विविध कार्यक्रमांव्यतिरिक्त भारती काही जाहिरातींच्या माध्यमातूनही घसघशीत मानधनाची कमाई करते.

22bharti1

सुनील ग्रोवर – टेलिव्हिजन, चित्रपट आणि रेडिओ अशा विविध माध्यमातून आपल्या धमाकेदार विनोदाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा विनोदवीर सुनील ग्रोवर त्याने साकारलेल्या गुत्थी या भूमिकेसाठीसुद्धा ओळखला जातो. कॉर्पोरेट क्षेत्रांमधील कार्यक्रमांसाठी सुनील प्रत्येक परफॉर्मन्सचे १०-१५ लाख रुपये मानधन घेतो.

vg0tv1ka