अभिनेता रणबीर कपूरवर त्याच्या वाढदिवशी सर्वांकडूनच शुभेच्छा दिल्या जात आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षात पदार्पण केले असूनही रणबीर आजही ‘मम्माज बॉय’ आहे, असेच म्हणावे लागेल. बॉलिवूडमधला एक प्रसिद्ध अभिनेता आणि विषेशत: तरुणींमध्ये गाजणाऱ्या रणबीरने चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा केला. रणबीर सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसल्यामुळे त्याच्या वतीने आई नीतूने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

नीतू सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रणबीरचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. बहिण रिद्धीमा कपूर सहानीनेसुद्धा रणबीरचा कुटुंबासमवेत एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर, इथे ‘डॅडी’ ऋषी कपीर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटनरुन रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर सध्या अनुराग कश्यपच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे, पण कामात व्यग्र असूनही रणबीरने चक्क ‘फुटबॉल’ची प्रतिकृती असणारा एक केक कापत वाढदिवस साजरा केला. या चित्रपटामध्ये रणबीर त्याची बहुचर्चित प्रेयसी कतरिना कैफसोबत झळकेल. दरम्यान सध्या रणबीर चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या निमित्ताने. या चित्रपटामध्ये रणबीर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची केमिस्ट्री पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Happy bday 💃🏼❤️😘 love you both

A photo posted by Riddhima Kapoor Sahni (@riddhimakapoorsahni) on