बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने परत एकदा त्याचे औदार्य दाखवले आहे. सलमान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींसाठी जेवढा ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. सलमानने काही दिवसांपूर्वी एका पाच महिन्याच्या अर्भकाचे प्राण वाचवले. गरोदरपणातच बाळाच्या आईचा मृत्यू झाला. सलमानने बाळाच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी १ कोटींची मदत केली.

सलमान नेहमीच लोकांना कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी पाच महिन्याच्या अर्भकाचे प्राण वाचवून त्याने अनेकांच्या शुभेच्छा घेतल्या आहेत. २००७ मध्ये त्याने बिइंग ह्युमन नावाची संस्था सुरु केली होती. आतापर्यंत या संस्थेने लाखो गरजू लोकांची मदत केली आहे.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

बिइंग ह्युमन ही संस्था मुलांचे स्वास्थ आणि शिक्षण यांच्यासोबत अनेक प्रकारच्या आजारांसाठी ही संस्था गरजूंना सतत मदत करत असते. सलमानने आतापर्यंत मुलांचे शिक्षण, स्वास्थ्य आणि इतर गोष्टींसाठी ५० कोटींपर्यंत खर्च केले आहेत. तसेच बिइंग ह्युमन या संस्थेने साधारणपणे हजार मुलांच्या हृदय विकाराच्या शस्त्रक्रियेचाही खर्च केला आहे.

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या ‘ब्लॉकबस्टर’ सिनेमात करिश्मा सलमान खानसोबत झळकली होती. त्यानंतर आता ती लवकरच ‘जुडवा २’ या आगामी सिनेमात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. डेविड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ या सिनेमात वरुण धवन सोबत सलमान खान दिसणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. आपल्या मुलाच्या सिनेमात काम करण्यासाठी सलमानला राजी केल्यानंतर डेविड धवन यांनी चित्रपटात सलमानच्या साथीला करिश्माला पसंती दिल्याचे समजते. या सिनेमात संधी मिळाल्यास काम करण्यास उत्सुक असल्याचे करिश्माने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.