‘भाईजान’ सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ट्युबलाइट’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालाय. सलमानला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते तर उत्सुक होतेच शिवाय सलमान आणि त्याची टीमसुद्धा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तेवढीच उत्सुक होती. आधी चित्रीकरण आणि त्यानंतर प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतल्यानंतर ‘ट्युबलाइट’ची टीम आता आनंद साजरा करत आहे. जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत सलमानने हा आनंद साजरा केलाय.

सलमानची बहिण अर्पिता खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये सलमान, सोहेल आणि दिग्दर्शक कबीर खान मिळून केकचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यासोबतच अर्पिताने ‘ट्युबलाइट’ केकचा फोटोसुद्धा शेअर केलाय. आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबतचाही तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

https://www.instagram.com/p/BVr_5q5jlQc/

https://www.instagram.com/p/BVsBcosDgHa/

चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी २१.१५ कोटींची कमाई केली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘ट्युबलाइट’ने पहिल्या दिवशी समाधानकारक कमाई नाही केली. २०१२ पासून आतापर्यंत पाहिल्यास ईदच्या मुहूर्तावर सलमानचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्या तुलनेत ‘ट्युबलाइट’ने फार कमी कमाई केल्याचं म्हटलं जातंय.

https://www.instagram.com/p/BVsBFMoD98y/

शुक्रवारी चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीही सलमान व्यस्त होता. मुंबईतल्या कुर्ला येथील एका सिनेमागृहात ‘बिईंग ह्युमन’च्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमानने जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी स्पेशल स्क्रिनिंगसुद्धा ठेवलं होतं. या स्पेशल स्क्रिनिंगला सोनाक्षी सिन्हा, प्रिती झिंटा, सुनिल शेट्टी, अथिया शेट्टी, सुरज पांचोली, गोविंदा, मनिष पॉल, अनिल कपूर हे कलाकार आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा बालकलाकार माटिन रे तंगूसुद्धा उपस्थित होता.

वाचा : निधनाच्या अफवांवर दिलीप कुमार म्हणतात….

या स्क्रिनिंगसाठी सलमानने शाहरूख खानलाही आमंत्रित केलं होतं आणि शाहरूख आपली मुलगी सुहानासोबत तेथे उपस्थित होता. ‘टयुबलाइट’मध्ये शाहरूख पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसतो.