छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंब-या आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आला. त्यांच्यावर आजवर काही मालिका आणि चित्रपटही येऊन गेले. आता पुन्हा एकदा महाराजांची ही शोर्यगाथा पडदयावर पाहण्याचे भाग्य प्रेक्षकांना मिळणार आहे.

डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंतपणे उभा करणारा ‘शिव छत्रपती’ ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. शिव छत्रपतीमध्ये उदय सोनवणे, सचिन राऊत, पंकज देशमुख, श्वेता काळे, सिध्दार्थ शिळीमकर, अभिजीत कदम, अबोली साठे, तेजस्विनी एडके, निखील मराठे, सोमेश्वर काळजे या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘शिव छत्रपती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साहस बर्फे याने केले आहे. तर अमृता कदम हिने चित्रपटाची कथा लिहिली असून धनंजय शिळीमकरने कला दिग्दर्शन केले आहे. ग्रे पार्क स्टुडिओचे संगीत लाभलेला “शिव छत्रपती” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सध्या ‘शिव छत्रपती या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली असून हा चित्रपट पहिल्या टिझरमुळे चर्चेत आला. त्यांतर आता चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणारे मावळे सुद्धा या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.