अभिनेता आमिर खानच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये सर्वजण व्यग्र असून अभिनेता आमिर खानही त्याच्या परिने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कशाचीही कमतरता पडू देत नाहीये. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक फोटोपासून ते अगदी चित्रपटाच्या गाण्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्रच ‘दंगल’ या चित्रपटाची प्रशंसा आणि चर्चा सुरु असतानाच या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शिर्षकगीताच्या ऑडिओ व्हर्जनबद्दल अभिनेता आमिर खाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे.

‘तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल…..’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला खणखणीत आवाजाचे गायक दलेर मेहंदी यांनी गायले आहे. त्यामुळे गाण्याचे शब्द, त्याची चाल आणइ एकंदर दलेर मेहंदी यांचा अवाज, पार्श्वभागात मिळणारा ढोलांचा ठेका या गाण्याच्या जमेच्या बाजू आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून उतरलेल्या या प्रोत्साहनपर गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केले आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

या चित्रपटामध्ये अभिनता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. आपल्या मुलींना कुस्तीसारख्या पुरुषी खेळामध्ये तरबेज बनवण्यासाठी आणि याच खेळामध्ये भविष्य घडवण्यासाठी मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेत आमिर दिसणार आहे. सध्या विविध मार्गांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये ‘दंगल’चे सर्वच कलाकार व्यग्र आहेत. पण, प्रसिद्धीचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या टेलिव्हीजन कार्यक्रमांच्या माध्यमातून मात्र या चित्रपटाचे प्रमोशन केले जात नाहीये. ‘दंगल’च्या प्रसिद्धीसाठी या चित्रपटाच्या मेकिंगचे काही व्हिडिओ, आमिरच्या व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आणि अशा हटके मार्गांचा अवलंब करत ‘दंगल’ या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आमिरने साकारलेली महत्त्वाकांक्षी वडिलांची भूमिका प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार का? याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.