विनोदी कलाकारांचा गट म्हणून ओळख असलेल्या एआयबीने नुकताच इंटरनेट समानते बाबत प्रचार करण्यासाठी एक नऊ मिनिटांचा व्हिडीओ युटय़ूबवर अपलोड केला आहे. ‘सेव्ह द इंटरनेट’ असे या व्हिडीओचे नाव असून त्याला काही तासांमध्येच सहा लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एआयबी नॉकआऊट या वादग्रस्त कार्यक्रमामुळे विनोदी कलाकारांचा हा गट चर्चेत आला होता. यामध्ये करण जोहर, रणवीर सिंग आणि अर्जून कपूर या कलाकारांचा समावेश होता. आता एआयबीतर्फे इंटरनेट समानतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एक व्हिडीओ अपलोड करण्यात केला आहे. यामध्ये चार कलाकारांनी एकत्र येऊन सर्व नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांना आणि सरकारला इंटरनेट सेवेत आणि दरात समानता आणण्याबाबत सुचविले आहे.
मोहिमेत सहभागी होण्यासाठी http://www.savetheinternet.in  या संकेतस्थळावर लॉगइन करण्याचे आवाहनही व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आले आहे.