अडीच हजार वर्षांपासून जतन केलेली ‘ममी’ पाहण्याची संधी

पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या इजिप्तमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींच्या मृतदेहांचे जतन करण्याची प्राचीन परंपरा आजही संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. ‘ममी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मृतदेहांचे जतन करण्याची पद्धत, त्यासाठी केलेल्या प्रक्रिया आणि त्यांचे ऐतिहासिक संदर्भ याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता असते. यातीलच एक ‘ममी’ मुंबईत पाहण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंद खोलीत असलेली ‘ममी’ आता सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. येत्या ४ जानेवारीपर्यंत वस्तुसंग्रहालयात या ‘ममी’चे दर्शन करता येणार आहे.

Construction supervisor murder,
कोंढव्यात बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून; इमारतीवरून फेकून दिले
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

इजिप्तमध्ये आढळणाऱ्या ‘ममी’ या जगभरातील संशोधकांच्या व अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे गूढ उकलण्यात या ‘ममीं’चा मोठा हातभार आहे. यांपैकीच एक ‘ममी’ छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात होती. ब्रिटिशांनी हे वस्तुसंग्रहालय उभारले तेव्हा ही ‘ममी’ येथे आणण्यात आली होती, अशी माहिती संग्रहालय व्यवस्थापनाने दिली. ब्रिटिश अधिकारी मायदेशात जात असताना इजिप्तमध्येही थांबा घेत असत. त्या वेळी तेथील पुरातन वस्तू, अवशेष ते आपल्या देशात अथवा वसाहती असलेल्या देशांत नेत असत. त्यातूनही ही ‘ममी’ भारतात आणली गेली असावी, असा अंदाज आहे. ही ‘ममी’ कधी आणण्यात आली, याचा तपशील उपलब्ध नसला तरी पहिल्या महायुद्धानंतर ती आणण्यात आली असल्याचा अंदाज आहे. मात्र तेव्हापासून इ.स. पूर्व ३८०-३४२ काळातील ‘ममी’

वस्तुसंग्रहालयात सध्या प्रदर्शित करण्यात येत असलेली ‘ममी’ इ.स.पूर्व ३८०-३४२ सालातील असण्याची शक्यता आहे. या ‘ममी’सारखीच एक ‘ममी’ सध्या बर्लिन येथेही आहे. मृतदेह जतन करण्यासाठी वापर करण्यात आलेले लाकूड व कापडावरील नक्षी यामुळे ती टॉलेमिक काळातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. या ‘ममी’सोबत इजिप्शियन संस्कृतीतील ब्राँझची ओसिरीसची मूर्ती, कापडावर काढण्यात आलेली चित्रे आदीदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.