कापूरबावडी परिसरात सोमवारी दुपारी प्रदीप कीर (५२) याने पत्नी पूजा (३४) आणि तिचा मित्र मनजीत आनंद (४३) यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये पूजा गंभीररित्या तर मनजीत किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी प्रदीपला अटक केली आहे. 

दादर परिसरात रहाणारा प्रदीप व पूजा यांच्यात काही वर्षांपुर्वी घटस्फोट झाला आहे. पूजा आणि मनजीत यांची चांगली मैत्री असल्यामुळे प्रदीपच्या मनात चीड होती व त्याला तिच्या चारित्र्यावर संशय होता. एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पूजा पैसे काढण्यासाठी आली असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला.