अंबरनाथ, टिटवाळा फेऱ्यांवर गदा; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी; आता ‘सीएसएमटी’वरून शेवटची लोकल लवकर निघणार

हार्बर व ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर १ ऑक्टोबरपासून २८ नवीन वाढीव लोकल फेऱ्या सुरू केल्या असतानाच मध्य रेल्वेकडून आता मुख्य मार्गावरही १८ वाढीव फेऱ्यांचा दिलासा प्रवाशांना देण्यात येत आहे. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या शेवटच्या लोकलच्या वेळा अलिकडे आणल्या आहेत.

amol kolhe, amol kolhe taking 5 years break from acting, shirur lok sabha seat, shivajirao adhalrao patil, Shivajirao adhalrao patil criticize amol kolhe, marathi news, lok sabha 2024, election news,
पुणे : ‘अमोल कोल्हे’ मालिकांमधून संन्यास घेणार ? आढळराव व्हिडिओ दाखवत म्हणाले, हा तर चुनावी जुमला!
News anchor news
“क्लिवेज नाईटक्लबसाठी असतात”, ट्रोल झाल्यानंतर टीव्ही अँकरने दिलं चोख उत्तर, कपड्यांवरून पात्रता ठरवणाऱ्यांना महिलांनी अशीच शिकवावी अद्दल!
pune district central co op bank open late night marathi news
अजित पवारांना धक्का! वेल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
RTO Corruption Exposed, Three Officials Arrested, amravati rto, Registering Stolen Trucks, three Officials Arrested Registering Stolen Trucks, Forged Documents, egional Transport Office or Road Transport Office, Amravati news, marathi news,
अमरावती : तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी
Central Institute of Fisheries Education Mumbai Bharti 2024 Young Professional II Vacant Post Available
CIFE Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे निवड, ४२ हजारांपर्यंत पगार; अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या
Unknown Assailants Threaten Journalist, Borivali Residence, Case Registered, neha purav, Journalist neha purav, journalist neha purav house Threaten, Mumbai news, Journalist neha purav news, neha purav news, marathi news,
पत्रकार महिलेला धमकावल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल
n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Despite Ajit Pawars request no action has been taken against doctor who threw alcohol party in Sassoon Hospital
अजितदादांनी सांगूनही कारवाई नाही! मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांना घातले पाठीशी

१ नोव्हेंबरपासून मुख्य मार्गावर या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यामध्ये मात्र २५ नवीन फेऱ्या सुरू करतानाच सध्या सुरू असलेल्या सात लोकल फेऱ्यांवर गदा आणण्यात आली आहे. त्यामुळे १८ वाढीव फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत येतील. रद्द करण्यात आलेल्या सात लोकल फेऱ्यांमध्ये सर्वाधिक अंबरनाथ, टिटवाळा या लोकलचा समावेश आहे. यामध्ये कुर्लाहून सुटणारी अंबरनाथ तसेच सीएसएमटी ते अंबरनाथ दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल आणि टिटवाळा ते आसनगाव, टिटवाळा ते कुर्ला व सीएसएमटी ते टिटवाळा या फेऱ्या आहेत. नवीन वेळापत्रकात सर्वात मोठा दिलासा हा कल्याण, डोंबिलीकरांना मिळाला आहे. २५ फेऱ्यांपैकी तब्बल १७ फेऱ्या कल्याण व डोंबिवलीकरांच्या वाटय़ाला आल्या आहेत. महिला प्रवाशांना थोडा फार दिलासा देण्याचा यातून प्रयत्न केला आहे. सकाळी गर्दीच्या वेळेत टिटवाळा ते दादर आणि बदलापूर ते दादर या दोन नवीन फेऱ्यांमध्ये कल्याण दिशेला तीन डबे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. वाढीव फेऱ्यांमुळे मुख्य मार्गावरील फेऱ्यांची संख्या ही ८३८ वरून ८५६ वर पोहोचली. तर मध्य रेल्वेवरील एकूण फेऱ्यांची संख्या ही १,६८८ वरून १,७०६ पर्यंत पोहोचल्याचे उदासी म्हणाले.

डाऊन दिशेला जाणाऱ्या नवीन फेऱ्या

  • ’विद्याविहार ते टिटवाळा – स. ६.४७
  • ’सीएसएमटी ते कल्याण- स.९.०५
  • ’दादर ते कल्याण- स.१०.०९ वा
  • ’दादर ते कल्याण- दु.३.०० वा
  • ’विद्याविहार ते कल्याण- सायं.५.३०
  • ’विद्याविहार ते कल्याण- सायं.६.१५
  • ’ठाणे ते कल्याण- सायं.५.२५ वा
  • ’दादर ते डोंबिवली- दु.१२.२० वा
  • ’दादर ते डोंबिवली- दु.१२.३७ वा
  • ’दादर ते डोंबिवली- दु.१२.३७ वा
  • ’दादर ते डोंबिवली- दु. १.४३ वा
  • ’सीएसएमटी ते कुर्ला- ००.३१ वा
  • ’सीएसएमटी ते कुर्ला- स.११.०८
  • ’दादर ते बदलापूर- रा.११.१८ वा
  • अप दिशेला जाणाऱ्या नवीन फेऱ्या
  • ’खोपोली ते कर्जत- स.५.१० वा
  • ’कर्जत ते सीएसएमटी-सायं.५.५६
  • ’कल्याण ते दादर- स.१०.४५ वा
  • ’कल्याण ते दादर- स.११.१७ वा
  • ’कल्याण ते ठाणे- सायं.४.३८ वा
  • ’कल्याण ते ठाणे- सायं.६.१० वा
  • ’डोंबिवली ते सीएसएमटी- दु.१.३२वा
  • ’डोंबिवली ते दादर- दु.१.४८ वा
  • ’डोंबिवली ते सीएसएमटी-दु.२.५८वा
  • ’आसनगाव ते ठाणे- रा.११.०८ वा

फेऱ्यांच्या बदललेल्या वेळा

  • ’सीएसएमटी-कर्जत लोकल रात्री १२.३० ऐवजी १२.२० वाजता सुटेल
  • ’सीएसएमटी-बदलापूर लोकल सकाळी ७.२५ ऐवजी सकाळी ७.०५ वाजता सुटेल.
  • ’सीएसएमटी ते खोपोली लोकल सकाळी ७.५३ ऐवजी सकाळी ७.३० वाजता सुटेल.
  • ’सीएसएमटी ते कर्जत लोकल सकाळी ८.२९ ऐवजी सकाळी ८.१६ वाजता सुटेल.
  • ’सीएसएमटी ते कर्जत लोकल सकाळी ९.०८ ऐवजी सकाळी ९.०१ वाजता सुटेल.
  • ’कसारा ते सीएसएमटी लोकल रात्री १०.३५ ऐवजी सकाळी १०.०५ वाजता सुटेल.
  • ’बदलापूर ते सीएसएमटी लोकल रात्री ११.५० ऐवजी रात्री ११.३१ वाजता सुटेल.

ब्लॉकमधील कामांसाठी जादा वेळ

सात लोकल फेऱ्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण पुढे करतानाच ब्लॉक घेऊन करण्यात येणाऱ्या कामांना जादा वेळ मिळावा यासाठी त्या लोकल फेऱ्या बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे काही लोकल फेऱ्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून त्यामुळेही कामे करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो असा दावा केला आहे. दहा मिनिटे ते अर्धा तास अधिक ब्लॉकच्या कामांसाठी वेळ मिळेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

अकरा फेऱ्यांचा विस्तार

  • ’कल्याण-सीएसएमटी लोकल आता टिटवाळा येथून सीएसएमटीसाठी ५.०५ वाजता सुटेल.
  • ’आसनगाव-सीएसएमटी लोकल आता कसारा येथून ५.०० वाजता सुटेल.
  • ’सीएसएमटी-टिटवाळा लोकल ही सीएसएमटीहून ९.३२ वाजता सुटेल आणि कसारा येथे ००.११ वाजता पोहोचेल.
  • ’कसारा-ठाणे लोकल कसारा येथून ५.१७ वाजता सुटेल आणि ती सीएसएमटीसाठी चालवण्यात येईल.
  • ’कर्जत-ठाणे लोकल कर्जत येथून १०.४५ वाजता सुटेल आणि ती सीएसएमटीपर्यंत धावेल.
  • ’दुपारी ३.५३ वाजताची सीएसएमटी ते बदलापूर लोकल कर्जतपर्यंत धावेल.
  • ’सायंकाळी ४.१३ वाजताची दादर ते कल्याण लोकल बदलापूपर्यंत धावेल.
  • ’रात्री १०.३१ वाजता सुटणारी सीएसएमटी ते कर्जत लोकल रात्री १०.२८ वाजता खोपोलीसाठी सुटेल.
  • ’रात्री ११.१८ वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकल खोपोलीपर्यंत धावेल.
  • ’रात्री ८.२६ वाजताची बदलापूर-ठाणे लोकल बदलापूर येथून रात्री ८.२४ वाजता सुटेल आणि सीएसएमटीपर्यंत धावेल.
  • ’रात्री १०.५२ वाजता सुटणारी दादर ते कल्याण लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल.

बदललेल्या वेळा

  • ’सीएसएमटी ते ठाणे रात्री १२.३४ ऐवजी रात्री १२.३१ वाजता सुटेल.
  • ’कुर्ला स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल रात्री १.०२ च्याऐवजी रात्री १२.५६ वाजता मिळेल.
  • ’ठाणे स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाण्यासाठी रात्री १.२४ च्या ऐवजी रात्री १.१९ वाजता लोकल उपलब्ध होईल
  • ’कल्याण स्थानकातून कर्जतच्या दिशेने जाण्यासाठी रात्री १.५७ च्या ऐवजी रात्री १.५२ वाजता लोकल उपलब्ध होईल.

रद्द सात लोकल

  • ’कुर्ला ते अंबरनाथ – पहाटे ४.४४ वा
  • ’सीएसएमटी ते अंबरनाथ – सकाळी ७.०५ वा
  • ’अंबरनाथ ते सीएसएमटी – रात्री ८.२९ वा
  • ’टिटवाळा ते आसनगाव – सकाळी ५.०५ वा
  • ’टिटवाळा ते कुर्ला – रात्री ११.४६ वा
  • ’आसनगाव ते कल्याण – रात्री.११.३२ वा
  • ’सीएसएमटी ते टिटवाळा – रात्री. १०.२० वा

दोन फेऱ्यांमध्ये कल्याणकडील तीन डबे महिलांसाठी

  • ’टिटवाळा ते दादर- स.८.१० वा
  • ’बदलापूर ते दादर- स.८.४५ वा

जानेवारीपासून २४ फेऱ्या हार्बर व ट्रान्स हार्बरवर

  • ’ऑक्टोबरपासून हार्बर व ट्रान्स हार्बरवर २८ नवीन लोकल फेऱ्या सुरू केल्या असतानाच ३१ जानेवारीपासून आणखी २४ लोकल फेऱ्या या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
  • ’दिवा स्थानकात काही जलद लोकलला १ नोव्हेंबरपासून थांबा. सध्या थांबा देण्यात येणाऱ्या २४ जलद लोकलची संख्या ही ४६ पर्यंत पोहोचेल.