पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता ही मागणी करण्यात आली. दरम्यान, शिंदे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

खारमधील एस व्ही रोडवरील मॅक्लॉइड पेट्रोलपंपाजवळ विलास शिंदे कर्तव्य बजावत होते.  शहरातील २०१३ सालच्या वाहनांविषयीची माहिती वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. विलास शिंदे २३ ऑगस्ट रोजी हेच काम करत होते. या दरम्यान त्यांना पेट्रोलपंपावर आलेला दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. शिंदेंनी तातडीने त्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला थांबवले आणि पहिले गाडीची चावी काढून घेतली. त्यांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराला परवाना आणि गाडीची कागदपत्रे मागितली. यानंतर त्या दुचाकीस्वाराने स्वतःच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. अल्पवयीन दुचाकीस्वाराचा २० वर्षांचा भाऊ अहमद मोहम्मद अली कुरेशी घटनास्थळी आला. त्याने शिंदे यांच्या हुज्जत घालायला सुरुवात केली. यादरम्यान कुरेशीने स्वतःसोबत आणलेल्या बांबूने विलास शिंदे यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यांच्याकडून गाडीची चावी खेचून पळ काढला.
कुरेशीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. डोक्यावर प्रहार झाल्याने शिंदे कोमात गेले होते. गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. बुधवारी शिंदे यांच्या निधनानंतर पोलिसांवरील हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

विलास शिंदे यांच्या घरी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये खदखदणा-या रोषाचा सामना करावा लागला. शिंदे राहत असलेल्या पोलीस कॉलनीत मुख्यमंत्री दाखल होताच कॉलनीतील महिलांनी पोलिसांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. हेल्मेट घातलं नाही या क्षुल्लक कारणावरुन पोलिसांवर जीवघेणा हल्ला होतो, यावर चाप कधी बसणार असा उद्वीग्न सवालही या महिलांनी उपस्थित केला.