लायन्स क्लब नाशिक-पंचवटी आणि पुणे-आकुर्डी सफायरचा उपक्रम

येथील लायन्स क्लब नाशिक पंचवटी आणि पुणे आकुर्डी सफायर यांच्या सहकार्याने सप्तशृंगी गडावर हृदयविकाराच्या धक्क्यापासून जीवदान मिळण्यासाठी खास उपकरण बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून गडावर येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून राज्यात प्रथमच असा प्रयोग होत आहे.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

या बाबतची माहिती नाना सूर्यवंशी व वैद्य विक्रांत जाधव यांनी दिली. वणी येथील सप्तशृंगी देवी हे अनेकांचे श्रद्धास्थान असून देवीच्या दर्शनासाठी भारतातून तसेच देशाबाहेरून हजारो भाविक येत असतात. त्यात वयस्कर मंडळीसह मध्यवयीन लोकांचाही समावेश आहे. गडावर जाण्यासाठी व्हॅर्नाक्युलर ट्रॉली बसविण्यात आली असली तरी ती सुरू झालेली नाही. गडावर पायी जाण्याला सर्वाधिक पसंती आहे. पायी जात असतांना हृदयावर येणाऱ्या ताणाकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांना हृदयाच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. गड चढताना हृदयविकाराचा त्रास असलेल्या काही भाविकांना अचानक त्रास झाल्यामुळे जीव गमावण्याची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब नाशिक-पंचवटी आणि लायन्स क्लब पुणे आकुर्डी सफायर यांच्या मदतीने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदय पूर्ववत सुरू करणारे ‘कार्डियास डार्फिब्रिलॅटर’ यंत्र बसविण्यात येणार आहे. हे यंत्र क्लबने देवस्थान समितीला नुकतेच सुपूर्द केले असून गडाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ते नेमके कोठे बसवावे, याचा अभ्यास सुरू आहे. ते यंत्र कसे कार्यान्वित होईल याबाबत गडावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील सप्तशृंगी हे देवस्थान पहिले ठिकाण असे आहे की, ज्या ठिकाणी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यासाठी पुणे सफायरचे राजकमार रुट आणि नाशिक येथील वैद्य विक्रांत जाधव यांचे सहकार्य लाभले. या उपकरणामुळे तीव्र श्रमामुळे हृदय बंद पडल्यानंतर या उपकरणाद्वारे हृदयाला निश्चित केलेल्या विजेच्या लहरी पोहचून ते सुरळीत सुरू होईल. रुग्णाला पुढील उपचार मिळेपर्यंत त्याचे हृदय उत्तम राखण्यास हे यंत्र मदत करेल. रुग्णाचे प्राथमिक निदान करण्यात यंत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. भारतात मुंबई विमानतळ तसेच दिल्ली विमानतळानंतर सार्वजनिक ठिकाणी हे उपकरण बसविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपक्रमाला विनय सातपुते, जयंत येवला, अरुण अमृतकर, पंचवटी अध्यक्ष वैद्य नीलिमा जाधव आदींचे सहकार्य लाभले. दरम्यान, असे उपकरण अन्य ठिकाणी बसविण्याचे प्रस्तावित असून समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन क्लबने केले आहे.