अल्पावधीत नाशिकला आपला बालेकिल्ला म्हणून नावारूपास आणणाऱ्या मनसेची त्याच वेगात घसरण झाल्याचे महापालिका निकालाने स्पष्ट झाले आहे. राज्यातील पक्षाचे एकमेव सत्ताकेंद्र गमावताना मनसेची दाणादाण उडाली. गत वेळी ४० जागा पटकावणाऱ्या या पक्षाला यंदा अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागले. पाच उमेदवार कसेबसे पालिकेपर्यंत पोहोचले. पालिकेच्या सत्ताकाळात काही नावीन्यपूर्ण प्रकल्प साकारूनही मनसेला दारुण पराभवाला तोंड द्यावे लागले. त्यामागे

पक्षनेतृत्वाने मधल्या काळात केलेले दुर्लक्ष, पक्षांतर्गत दुफळी व पक्षांतर करणाऱ्यांची काडीमात्र दखल न घेण्याची भूमिका आणि विकासकामांच्या जाहिरातबाजीस झालेला विलंब.. असे घटक कारणीभूत ठरल्याचे लक्षात येते.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?

सर्वसामान्यांची नस सापडली की, समाजमनावर गारूड करणे सोपे असते. मागील महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा बोलबाला होण्यामागे ते महत्त्वाचे कारण होते. भयग्रस्त नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, राष्ट्रवादीकडून गुंडांना दिला जाणारा राजाश्रय या इतर राजकीय पक्षांनी वज्र्य केलेल्या मुद्दय़ांवर राज यांनी बोट ठेवले. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा सधन आणि दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे वेगळा ठरला. राज यांच्या अमोघ वक्तृत्वशैलीने असे गारूड केले की, मतदारांनी उमेदवार कोण, हे देखील पाहिले नव्हते. सर्वाधिक जागा मिळवून पालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या मनसेची या निवडणुकीत अतिशय बिकट अवस्था झाली. असे काही घडणार हे आपल्याच पक्षावर अविश्वास दाखवत पक्षांतर करणाऱ्या २७ नगरसेवकांनी आधीच अधोरेखित केले होते. मतपेटीतून केवळ त्यावर शिक्कामोर्तब झाले.

संघटनात्मक शैथिल्य

गत वेळी नाशिकला देशातील सर्वाधिक सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न राज यांनी दाखविले होते. परंतु, तीन ते चार वर्षे त्या दृष्टीने काही घडले नाही. जेव्हा काही प्रकल्प दृष्टिपथास आले, तोपर्यंत मनसेच्या वर्गातून बहुतांश विद्यार्थी पळून गेले होते. या काळात पक्षनेतृत्वाने जसे लक्ष देणे अभिप्रेत होते, तसे न दिल्याची परिणती मनसेच्या ऱ्हासात झाली. मागील निवडणुकीत विजयी सभा घेतल्यानंतर सहा महिने राज हे नाशिककडे फिरकले नव्हते. जेव्हा आले, तेव्हा बराच विलंब झाल्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे प्रत्येक महिन्याला भेट देण्याचे दिलेले आश्वासनही नंतर पाळले गेले नाही. पालिकेत भाजपने साथ सोडल्यावर सत्तेसाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यात आली. ही कृती मनसेच्या प्रतिमेवर परिणाम करणारी ठरली. राज यांचे विश्वासू सहकारी वसंत गीते यांच्या भरवशावर पक्षाचे काम चालायचे. त्यांच्या कार्यशैलीने एक गट कायम दुखावला जायचा. पक्षातील गटबाजी शमविण्याची गरज नेतृत्वाला वाटली नाही. पालिकेतील कार्यपद्धतीचा फटका मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसला. तेव्हा खरे तर स्वत:मध्ये बदल करण्याची संधी होती. परंतु, त्या निकालाने पक्षाच्या तंबूत अशी घबराट पसरली की, बहुतांश घटक इतरत्र सुरक्षित आसरा शोधू लागले. त्याची सुरुवात गीते यांच्यापासून झाली. त्यांच्या पाठोपाठ अन्य नगरसेवकांची सेना व भाजपमध्ये रांग लागली. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न झाला नाही.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मनसेने घाईघाईत पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान, संगीत कारंजा, आकर्षक वाहतूक बेट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शस्त्रास्त्र संग्रहालय आदी प्रकल्पांचे लोकार्पण करीत नव्याने तयारी केली. पण, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. राज्यातील कोणत्याही शहरात झाली नाहीत, इतकी कामे पाच वर्षांत नाशिकमध्ये केल्याचा दावा मनसेने अखेरच्या टप्प्यात केला. त्याचे राज्यात विपणन करण्यात आले. मुंबई व ठाण्यातील नागरिकांना हे प्रकल्प दाखविण्याकरिता आणले गेले. अतिशय अल्प काळातील विपणनाचा हा प्रयत्न फसला.

सत्ताधारी भाजपने आर्थिक बळाचा वापर करून मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावल्याचा आरोप राज यांनी प्रचारात केला. ‘पैसा महत्त्वाचा की, मनसेची विकासकामे’ हे निवडणूक निश्चित करणार असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना साद घातली. परंतु मतदार बधले नाहीत. त्यांनी मनसेचा सुपडा पुरता साफ केला.