ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाच्या पुनर्वसन आराखडय़ासाठी ठाणे महापालिकेलाही साकडे

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवलीचा प्रवास विनाअडथळा पूर्ण करता यावा यासाठी ऐरोली ते कळवादरम्यान रेल्वे उन्नत मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविताच ठाणे-कल्याणात सत्तापदी असलेल्या शिवसेनेला स्फुरण चढले असून तब्बल ४२८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात अडथळा ठरत असलेल्या सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक घरांचा पुनर्वसन आराखडा ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून पुढे रेटण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी सुरू केला आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

या प्रकल्पामुळे नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली मार्गावरील प्रवाशांचा ठाण्याला उतरून लोकल बदलण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या माध्यमातून बहुचर्चित दिघा रेल्वे स्थानकाचा मार्गही सुकर होऊ लागला असून महादू शेठ कान्हा ठाकूर काटय़ालगत हे स्थानक उभारले जाईल, हे स्पष्ट होऊ लागले आहे. केंद्र सरकारने या बहुचर्चित रेल्वे प्रकल्पास हिरवा कंदील दाखविताच शनिवारी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी या संपूर्ण पट्टय़ाचा दौरा करीत सरकारी निर्णयाचा अधिकाधिक फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. या प्रकल्पात नेमकी किती घरे बाधित होणार आहेत याचे सविस्तर सर्वेक्षण रेल्वे आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात असून यासंबंधीचा अहवाल येत्या महिनाभरात अपेक्षित आहे, अशी माहिती या वेळी शासकीय सूत्रांनी दिली.

ऐरोली ते कळवा उन्नत मार्गात ठाणे महापालिका हद्दीतील भोलानगर, न्यू शिवाजीनगर, मफतलाल कंपनी, ठाकूर पाडा आणि रेल्वे स्थानक परिसरातील काही घरे बाधित होण्याची शक्यता आहे. यासंबंधीचे सविस्तर सर्वेक्षण सुरू असले तरी प्रकल्पाचा आवाका लक्षात घेता महापालिका आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून सविस्तर पुनर्वसन धोरण राबविले जावे, असा सत्ताधारी शिवसेना नेत्यांना प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावांना महापालिकेच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. बाधित घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यामुळे नेमका आकडा येत्या आठवडाभरात स्पष्ट होऊ शकेल, असा दावाही खासदार विचारे यांनी केला.

४२८ कोटींची विशेष तरतूद

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पास मंजुरी देताना रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे विचारे यांनी स्पष्ट केले. जागतिक बँकेकडून ३४२ कोटी, केंद्र सरकारकडून ८६ कोटी रुपयांची अशी एकूण ४२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात या प्रकल्पासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बहुचíचत दिघा रेल्वे स्थानकाचा मार्गही मोकळा झाला असून महादू ठाकूर काटा परिसरात या स्थानकाची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सद्य:स्थितीत ठाणे-वाशी मार्गावर लोकलच्या ५२ फेऱ्या होतात. तर ठाणे-नेरुळ- २८, ठाणे-बेलापूर- चार आणि ठाणे-पनवेल मार्गावर २१ फेऱ्या होतात.