पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यावर सिडको आणि पनवेल महापालिकेची चालढकल

नवी मुंबई, खारघर मधील बेकायदा बांधकाम, फेरीवाले यांच्यावर कारवाईचा धडाका सुरु आहे. मात्र आजतागायत येथील फेरीवाल्याना ‘फेरीवाला भूखंड’ अंतर्गत वाटप झालेले नाही. महापालिकेने कारवाई करावी परंतु आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. पण सिडको आणि महापालिका मात्र एकमेकांकडे बोट दाखवताना याविषयाची जबाबदारी घेण्याचे टाळत आहेत.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

खारघर परिसरात बेकायदा फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकला होता. मात्र पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी बेकायदेशीर बांधकाम, फेरीवाले यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू करताना येथील पदपथ अतिक्रमणापासून मोकळे केले आहेत. पदपथावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी टपऱ्या, वडापावची गाडे, भाजी विक्रेत्यांच्या टपऱ्यामधून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत होते. सिडको प्रशासनाने आजतागायत या फेरीवाल्यांच्या समस्येकडे दुर्लक्षच केले आहे. खारघर हि स्मार्ट सिटी संबोधली जाते, मात्र या शहराचे शिल्पकार म्हणून संबोधणाऱ्या सिडकोला मात्र फेरीवाल्यांसाठीच्या भूखंडाचे वाटप करता आलेले नाही. तसेच आता पनेवल महापालिका आल्याने फेरीवाल्यांचा प्रश्न हा महापालिकेच्या अख्यारीत येतो, असे सांगून आपले अंग काढून घेतले आहे. तर दुसरीकडे पनवेल महापालिकेने सिडको हि नियोजन प्राधीकरण संस्था आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देणे ही सिडकोची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

फेरीवाल्यांसाठी २४ भूखंड राखीव

खारघरमध्ये अत्याधुनिक प्रकल्प सुरु आहेत, मात्र यामध्ये फेरीवाल्यांसाठी राखीव भूखंडांचे नियोजन करणे हे सिडकोला जमले नाही. शहरात एकूण २४ भूखंड आहेत, मात्र एकही भूखंड फेरीवाल्याना वाटप झालेला नाही. त्यामुळे ते भूखंड तसेच पडून आहेत. तसेच आता पनवेल महापालिका प्रशासन असल्याने त्याची जबाबदारी पालिकेची असे सांगितल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

फेरीवाला भूखंड वाटपाचे काम सुरु होणार होते. मात्र आता पनवेल महापालिका आल्याने त्यांचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही पनवेल महापालिकेची आहे.

गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, सिडको खारघर नोड

पनवेल महापालिका ही कायद्याच्या चौकटीत राहून शहरातल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करत आहे. सिडको हे नियोजन प्राधिकरण आहे. त्यामुळे फेरीवाल्याना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे हे सिडकोचे काम आहे. आम्ही महापालिकेतर्फे भूखंड वाटप  करून दरोरोजच्या बाजारासाठी जागा उपलब्ध करून देऊ .  त्यासाठी फेरिवाल्यांकडून कर आकारला जाईल, तो कर भरून त्यांना तेथे बसता येईल.

सुधाकर शिंदे, आयुक्त , पनवेल महानगर पालिका