चिंचवली, टेटवली, सावली

४० वर्षांपूर्वी मुंबईवर आदळणारे लोकसंख्येचे लोंढे शहराबाहेर थोपविता यावेत यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली असल्याचे जगजाहीर आहे. यापूर्वी शासकीय प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रिया आजच्यासारखी संमतीची नसल्याने एका अध्यादेशाद्वारे नवी मुंबई, पनवेल, उरण भागांतील ९५ गावांजवळील १६ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. यात शेतकऱ्यांच्या मर्जीला महत्त्व नव्हते. त्यावेळी केवळ तुर्भे व बेलापूर येथील ग्रामस्थांनी जमीन मोजणीला येणाऱ्या सर्वेअरना सहकार्य केल्याने या गावांचा महसूल रेकॉर्ड तयार आहे. या गावात असलेले काही सुशिक्षित तरुण याला कारणीभूत आहेत. या व्यतिरिक्त नवी मुंबईतील २७ गावांनी कमी- अधिक प्रमाणात हा विरोध कायम ठेवल्याने या गावांचा कोणताही रेकॉर्ड महसूल विभागात नाही. याच गावांच्या साखळीत बोनसरी, बोरवली, चिंचवली, टेटवली आणि ज्या ठिकाणी आता घणसोली रेल्वे स्थानक आहे त्या सावली गावाचा समावेश आहे. या पाचही गावांचा ठाणे तालुका महसूल दस्तावेजात उल्लेख आहे, पण या गावांचे अस्तित्व नाही. सिडकोने मध्यंतरी सावली गावातील चार घरे कायम ठेवून या गावाच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या बेकायदेशीर झोपडय़ांवर कारवाई केली होती, त्यामुळे नवी मुंबई शहर उभारणीत ही गावे उद्ध्वस्त झालेली आहेत. ब्रिटिश काळात झालेल्या सर्वेक्षणात या गावांचे अस्तित्व अधोरेखित झाल्यानेच ती नंतर महसुली दस्तावेजात आढळून आली असल्याचे काही जाणकार सांगतात.

how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

बोनसरी, बोरवली, चिंचवली, टेटवली, सावली या पाच गावांचे अस्तित्व नवी मुंबईतील अनेक नागरिकांना माहीत नाही. या गावांच्या खुणा आता पुसल्या गेल्याने या शहराच्या विकासात ही गावे हरवून गेलेली आहेत. काही स्थानिक रहिवाशांच्या आग्रहास्तव काही गावांचा नामोल्लेख आजही ऐकण्यास मिळत आहे. यात ऐरोली, गोठवली आणि तळवली या तीन गावांचा अविभाज्य घटक असलेल्या चिंचवली गावाचा समावेश आहे. खूप मोठय़ा प्रमाणात असलेल्या चिंचेच्या झाडांमुळे या छोटय़ाशा गावाला चिंचवली म्हटले जात होते. त्या चिंचेच्या झाडांचे अस्तित्व आजही आढळून येते. ऐरोली येथील सिमेन्स कंपनीच्या परिसरात या चिंचेची झाडे आहेत. चिंचवली गावाच्या अस्तित्वाची ओळख म्हणून ऐरोली येथील एका भव्य उद्यानाला चिंचवली उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे. गावाच्या वेशीबाहेर असणाऱ्या शेतीवाडीची राखण तसेच मशागत करण्यासाठी मोठय़ा कुटुंबातील काही सदस्य शेतावर राहण्यास जात होते. यात घरातील भांडणतंटादेखील कारणीभूत होता. या घरांना पाडय़ावरील घरे म्हटली जात असत. बोनसरी, बोरवली आणि टेटवली ही तीन गावे एमआयडीसी भागात येतात. येथील लोकवस्ती आदिवासी असल्याची नोंद आहे. त्यातील अडवली भुतवली हे एकमेव आदिवासी गाव आजही अस्तित्वात आहे. संपूर्ण आदिवासी असलेल्या या गावात प्रगतीची कवाडे खुली झालेली आहेत. त्यामुळेच या गावात आलिशान गाडय़ा व वातानुकूल यंत्रे सहज दिसून येतात. यातील बोरवली, बोनसरी आणि अडवली भुतवलीच्या उत्तर बाजूस असलेल्या टेटवलीतील आदिवासी लोकवस्तीला काही भूमाफियांनी त्यावेळी हुसकावून लावल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच येथील जमिनी एमआयडीसी संपादित करण्याचा प्रश्न उद्भवला नाही. त्या मोकळ्या जमिनी काही भूमाफियांनी हडप केल्याचे दिसून येते. टेटवली हे त्यापैकीच एक गाव. या गावातील जमिनी एमआयडीसी भागातील भंगार माफियांनी गिळंकृत केलेल्या आहेत तर येथील आद्य रहिवासी असलेल्या आदिवासींना समोरच्या दहिसर मोरी जंगलात हुसकावून लावण्यात आलेले आहे. त्यामुळे या डोंगरात आजही काही भागात तुरळक आदिवासी लोकवस्ती आढळून येते.

टेटवली गावच्या उद्ध्वस्त होण्याची ही कहाणी येथील जुने रहिवासी सांगतात. मात्र सावली आणि चिंचवली ही दोन गावे सिडकोच्या जमीन संपादन प्रक्रियेतच उद्ध्वस्त झालेली आहेत. सावली या गावाच्या चारही बाजूने घणसोली आणि कोपरखैरणे येथील आगरी समाजाची विस्तीर्ण अशी शेतजमीन होती. तिची मशागत करण्यासाठी या दोन गावातील काही कुटुंबे या गावात येऊन राहत होती असे सांगितले जाते. या ठिकाणी शेतीवाडी आणि झाडे मोठय़ा प्रमाणात असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात या भागात काही भाज्या पिकविल्या जात होत्या. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबे हिरव्यागार झाडांच्या सावलीत या ठिकाणी दिवस घालवत होती. यामुळे या गावाला सावली असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. या पाडय़ाच्या दक्षिण बाजूस पीर दर्गा आणि उत्तर बाजूस एक देवीचे मंदिर आहे. पूर्व आणि पश्चिम बाजूस शेती पसरलेली होती. या दोन दैवतांचे पूजन केल्यानंतरच येथील शेतीची मशागत किंवा कापणी केली जात होती. या गावाची अर्धी हद्द ही एमआयडीसीत असल्याने घणसोली आणि कोपरखैरणेतील अनेक शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने संपादित झालेली आहे. सध्या अस्तित्वात असलेले घणसोली रेल्वे स्थानक हे खऱ्या अर्थाने सावली गावाच्या हद्दीत आहे. मात्र या स्थानकाला सावली नाव द्यावे यासाठी भांडणारा या गावात शेवटपर्यंत एकही रहिवासी शिल्लक राहिला नाही. सिडकोने काही वर्षांपूर्वी केलेल्या एका कारवाईत या ठिकाणी असलेल्या चार झोपडीवजा घरे वगळून आजूबाजूला उभ्या राहिलेल्या बेकायदेशीर झोपडय़ांवर बुलडोझर फिरवला होता. काही भूमाफियांनी या गावाच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जमिनी विकण्यास सुरुवात केली होती. या गावात असलेल्या एका जुन्या विहिरीचे अस्तित्व आजही कायम आहे. त्याचबरोबर दक्षिण बाजूला असलेल्या दग्र्याला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी पालिकेने एक अद्यावत उद्यान बनविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या दोन्ही आगरी गावांच्या परंपरा, रूढी या घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, गोठवली येथील आगरी कोळी बांधवांसारख्याच होत्या. या ठिकाणी असणारी घरे ही बोटावर मोजण्याइतकीच होती, पण या गावांच्या सातबाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात जमिनी असल्याने महसूल विभागात ही गावे आजही अजरामर आहेत. या गावाच्या जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविल्याने सातबाऱ्यावर असलेल्या जमिनींचे अ‍ॅवार्ड कॉपी तयार करण्यात आलेल्या आहेत. आज जमीन संपादन करताना ती मोजून घेतली जाते. मात्र ४७ वर्षांपूर्वी ही जमीन जैसे थे स्थितीत संपादित करण्यात आली होती. त्यामुळे गावांचे रीतसर सर्वेक्षण होऊ शकले नाही. त्याचे परिणाम प्रकल्पग्रस्तांना आज भोगावे लागत आहेत. गावातील घरांचे कोणतेच जमीन दस्तावेज उपलब्ध नसल्याने या घरांना बांधकाम परवनगी मिळविताना कठीण जात आहे. या उद्ध्वस्त पाच गावांच्या जमिनीवरील घरांचेही कोणतेच दस्तावेज नसल्याने सिडकोने यातील दोन गावांचे अस्तित्व मान्य केले नाही. त्यामुळे महसूलच्या पटलावर असलेली ही गावे मात्र नवी मुंबईकरांच्या स्मरणातदेखील नाहीत, हे दुर्दैव आहे. (उत्तरार्ध)