कुतूहल: डायलिसिस कशासाठी?

एखाद्या व्यक्तीची मूत्रिपडे निकामी झाल्यामुळे ती व्यक्ती डायलिसिसवर (व्याश्लेषण) आहे असं आपण ऐकतो. ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि तिची गरज का पडते?
आपल्या शरीरात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधून अनेक टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात. शरीराला अन्न-पाण्याची जितकी गरज आहे, तितकीच गरज शरीरात निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची आहे. कारण हे पदार्थ केवळ शरीराला निरुपयोगीच नसतात तर ते हानीकारक आणि विषारीसुद्धा असतात. जर ते शरीरात साठून राहिले तर नक्कीच त्याचे घटक परिणाम शरीरावर झाल्याचं आपल्याला आढळून येतं. उदाहरणार्थ, आपण जे अन्न खातो ते पचल्यानंतर त्यातले वेगवेगळे घटक एकतर शरीरातल्या पेशींकडून वापरले जातात आणि नाहीतर ते पेशींमध्ये साठवले जातात. पण प्रथिनं मात्र आपल्या शरीरात साठवली जात नाहीत. प्रथिनांच्या पचनातून अमिनो आम्ल तयार होतात. अतिरिक्त अमिनो आम्लांचं रूपांतर युरियामध्ये केलं जातं. ही प्रक्रिया यकृतात घडते. आता आपल्या शरीराच्या दृष्टीने युरिया हा टाकाऊ पदार्थ आहे. यकृतात तयार झालेला हा युरिया रक्तात मिसळतो आणि रक्तावाटे वाहून नेला जातो. युरियासारखे टाकाऊ पदार्थ जसे रक्तावाटे वाहून नेले जातात, तसेच शरीराला उपयुक्त असणारे अनेक पदार्थही त्याच वेळी वाहून नेले जातात. त्यामुळे रक्तातले उपयुक्त घटक तसेच ठेवून युरियासारख्या टाकाऊ पदार्थाना वेगळं करण्याचं काम मूत्रिपडे करतात. रक्तातून वेगळ्या केलेल्या टाकाऊ पदार्थाचं मूत्र बनतं. ते मूत्राशयात जमा करून शरीराबाहेर टाकलं जातं.
जर रक्तातून युरिया वेगळा केला गेला नाही तर रक्तातलं युरियाचं प्रमाण वाढत जातं. याला ‘युरेमिया’ असं म्हणतात. मूत्रिपड निकामी झालेल्या व्यक्तीमध्ये नेमकं हेच घडतं. म्हणून एखाद्या व्यक्तीची मूत्रिपडे निकामी झाली तर डायलिसिस किंवा व्याश्लेषण प्रक्रियेने रक्तातला युरिया वेगळा केला जातो. या प्रक्रियेत शरीरातलं रक्त एका कृत्रिम उपकरणातून प्रवाहित करून चक्क गाळलं जातं आणि युरिया वेगळं केलेलं रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं. म्हणजेच जे काम मूत्रिपडे करतात, ते काम यंत्राद्वारे घडवून आणलं जातं.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व: एकसत्ताक राजकीयता कोणत्याही साम्राज्यसत्तेची असतेच
कॉ. शरद् पाटील ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्मणी?’ (१९९२, खंड दोन, भाग दोन) या पुस्तकातील ‘शिवाजी- आकलनाचे दृिष्टकोन’ या पहिल्या प्रकरणात बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून एकनाथ रानडे यांच्यापर्यंतच्या इतिहासकारांनी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनांची साधार चिकित्सा केली आहे. त्यात ते भारताच्या संदर्भात ‘राष्ट्र’ हा शब्दप्रयोग तपासताना लिहितात-
.. भारतीय संघराज्य आज प्रजासत्ताक आहे, पण राष्ट्र नाही.. भौगोलिकता, भाषिकता, सांस्कृतिकता, राजकीयता व आर्थिकता यांची ‘एकमयता’ निर्माण झाल्यानंतर आधुनिक राष्ट्र तयार होते, असे स्तालीन सांगतो. ब्रिटिश साम्राज्यशाहीने रेल्वे रूळ व तारायंत्राच्या तारांनी भारताला एका आर्थिक पाशाने बांधल्यामुळे भारत हे पहिल्याप्रथम राष्ट्र बनले अशी रूढ समजूत आहे. या समजुतीप्रमाणे भारत हे त्यापूर्वी राष्ट्र नव्हते हे उघड आहे. पण, त्यापूर्वीच्या मौर्यापासून मुगलांपर्यंतच्या साम्राज्यसत्ता देशभर रस्त्यांचे जाळे विणून व्यापाऱ्यांना माल वाहतुकीच्या उगमापासून त्याच्या विक्रीहाटापर्यंत दोनच ठिकाणी जकाती घेण्यातून एका आर्थिक पाशाने बांधतच होत्या. एकसत्ताक राजकीयता कोणत्याही साम्राज्यसत्तेची असतेच. अनेक भाषिक व अनेक सांस्कृतिक वंशांनी अनेक पाश्चात्य राष्ट्रे बनलेली आहेत. स्वित्र्झलडसारखा देश तीन भाषिकांचा व वंशांचा बनलेला आहे. ते ‘एकमय लोक’ असले, तरी ग्रेट ब्रिटनमध्ये आयरिश लोक अजूनही स्वातंत्र्यासाठी युद्धरत आहेत. आयरिश रिपब्लिकन आर्मीचे स्वतंत्र राष्ट्राचे उद्दिष्ट जेव्हा फलद्रूप होईल तेव्हा होईल; पण तोपर्यंत ग्रेट ब्रिटन एक राष्ट्र होते ही नोंद इतिहासाला मिटवता येणार नाही. भौगोलिकता व एकप्रादेशिकता ही कितीही बदलली असली, तरी जोपर्यंत अस्तित्वात असते, तोपर्यंत त्या एकप्रादेशिकांना राष्ट्र म्हणावेच लागते. प्राचीन ग्रीक गणराज्यांची एकप्रादेशिकता गणसमाजाबरोबर नष्ट झालेली असली, तरी तोपर्यंत स्पार्टा, अथेन्स, इ. राष्ट्रे होती हे कोणी नाकारू शकत नाही. औरंगजेब सर्व तद्देशीय धर्मवंशजातीयांना ‘हिंदुस्तानी’ म्हणे यावरून हिंदुस्तान हे राष्ट्र असल्याचे सूचित करीत होता.. अलबिरूनीच्या मते तुर्कपूर्व हिंदुस्तान एक राष्ट्र होता हे त्याच्या ग्रंथांच्या नावावरूनच स्पष्ट होते.

मनमोराचा पिसारा: तू कधी थांबणार?
अंगुलीमाल हा बुद्धकालीन एक भयानक वाटमाऱ्या होता. आक्रमक, हिंस्र आणि क्रूर स्वभावाचा. त्याची दहशत जबरदस्त होती. अंगुलीमाल हे त्याला त्याच्या दुष्कृत्यांवरून पडलेलं नाव.
मनात लालसा उत्पन्न झाली की त्यानं अडवलेल्या माणसाचा मुडदा पाडीत असे. त्याच्या अंगावरचं, बरोबरचं धन लुटून तो थांबत नसे. त्याच्या मनात भयावह क्रूरपणा उत्पन्न व्हायचा. आपल्या धारदार शस्त्रानं तो त्या व्यक्तीची बोटं कापून टाकीत असे.
त्या बोटांची माळ तो गळ्यात घालायचा म्हणून अंगुलीमाल..
या अंगुलीमालाला शांत करण्याची कोणाची हिंमत होत नसे. एकदा तथागत श्रावस्तीकडे निघाले असता, या अंगुलीमालानं त्यांना गाठलं. गाठलं म्हणजे त्यांचा पाठलाग सुरू केला. बुद्ध त्यांच्या वेगानं झपाटय़ानं पुढे चालू होते.
अंगुलीमालानं त्यांच्याकडे पाहून म्हटलं, ‘‘हे भिक्षू, थांब, थांब..’’ बुृद्ध चालत राहिले. त्यानं पुन्हा आक्रमक पुकारा केला, ‘‘थांब, थांब.’’
तथागत न थांबता म्हणाले, ‘‘मी तर केव्हाच थांबलोय; तू कधी थांबणार?’’ ते शब्द अंगुलीमालाच्या कानावर पडले. तथागतांच्या स्वरात ना भीतीची कंपनं, ना आपण झपाटय़ानं पुढे जात असल्याचा दर्प.
त्यांची वाणी प्राकृत आणि स्थिरचित्त होती. थांबण्याची क्रिया त्यांना अवगत असल्याची प्रखर जाणीव होती.
तू कधी थांबणार आहेस? हे शब्द त्या रानावनात दुमदुमले असतील. पशू-पक्षीही स्तब्धावले असतील; पानं-फुलं स्थिर झाली असतील. कदाचित.. कदाचित पण अंगुलीमाल मात्र थांबला. थबकला नाही, थांबला तो थांबलाच.
अंगुलीमालच्या आयुष्यातला तो क्षण सत्याचा आविष्कार ठरला. द मोमेंट ऑफ ट्रथ!
अंगुलीमालनं वाटमारी थांबवली; त्यानं आपली क्रूर्कम थांबवली, त्याच्या मनात क्षणोक्षणी उसळणारी लालसा थांबवली. समोर दिसणाऱ्या सावजाकडे मनात उफाळून येणारी हिंसेची, चोरीमारीची तण्हा (तृष्णा) थांबवली. त्याला असल्या लालसेमधलं ‘अनिच्च’ तत्त्व कळलं-आकळलं म्हणून तो थांबला..
तथागतांनी मानवी व्यवहाराची संगती लावली. त्यामागील तर्कशुद्ध कार्यकारणपरंपरा समजून घेतली आणि चार आर्यसत्यं आणि धम्मचक्र प्रवर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली. परिच्च सम्मुपाद या सिद्धान्ताचं विवरण केलं. प्रत्येकाला मनात अंतज्र्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचा मध्यममार्ग दाखवला.
अंगुलीमालसम लालसेचं स्वरूप बदललंय. आन् चंगळवादाच्या रूपात प्रत्येक व्यक्तीत एक अंगुलीमाल निर्माण झालाय. आपण वाटमारी करतोय, परिसराची, नैसर्गिक उपजत इंधनांची आणि नातेसंबंधांची!!
क्षणभर विसावून मनात डोकावलास तर मित्रा, आजही तथागतांच्या शब्दाचे प्रतिध्वनी ऐकू येतील. तू कधी थांबणार??
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com